हैदराबाद - पॅन-इंडिया स्टार प्रभासच्या आगामी राधे श्याम चित्रपटाच्या निर्मात्यांनी १४ फेब्रुवारीला 'दशकातील सर्वात मोठ्या प्रेमाची घोषणा' करण्याची तयारी केली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्री टीझरने व्हॅलेंटाईन दिवसासाठी परफेक्ट वातावरण निर्मिती केली आहे.
प्री टीझर यूव्ही क्रिएशन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर आहे. व्हिडिओमध्ये प्रभास एखाद्या बर्फाच्छादित लेनवर काही गोष्टीबद्दल विचार करत हसत चालला आहे आणि पार्श्वभूमीत हळूवारपणे संगीत लहरी उमटत आहेत. प्री टीझरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "दशकातील सर्वात मोठ्या प्रेमाच्या घोषणेसाठी तयार व्हा!" ️ १४ फेब्रुवारी, तारीख राखून ठेवा!
युरोपच्या पार्श्वभूमीवर घडत असेली ही प्रेमकथा एक महाकाव्य असल्याचे मानले जात असले तरी या चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटात प्रभास पहिल्यांदाच पूजा हेगडेसोबत स्क्रिन स्पेस शेअर करीत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री आणि कुणाल रॉय कपूर यांच्या भूमिका आहेत.
हा चित्रपट बहुभाषिक असून हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. राधा कृष्ण कुमार लिखित आणि दिग्दर्शित राधे श्याम या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!