ETV Bharat / sitara

रस्त्यावरील खड्ड्यामुळे संतापला पुष्कर श्रोत्री, व्हिडिओद्वारे व्यक्त केला संताप - pushkar shrotry news

'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला पुष्करला ३ तास लागले.

पुष्कर श्रोत्री
author img

By

Published : Sep 17, 2019, 10:58 AM IST

मुंबई - 'चांद्रयान-2' ला चंद्रावर सापडणार नाहीत एवढे खड्डे सध्या कल्याण- शीळ मार्गावर पडलेत. त्यामुळे डोंबिवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः नरकयातनाचा सामना करावा लागतोय. याबाबत काही दिवसांपूर्वी स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर कल्याणमध्ये नाट्य प्रयोगासाठी आलेल्या प्रशांत दामले यांनी त्यावर पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली. तर, याच शृंखलेत आता पुष्कर श्रोत्रीच्या नावाचीही भर पडली आहे.

पुष्करने आज त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. १५ सप्टेंबरच्या रात्री साडे आठ वाजता पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला आपल्याला सव्वा ३ तास लागले. तर अभिनेता अनिकेत विश्वासराव याला सव्वा ४ तास लागले. हे सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचं त्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. एवढं करून पूर्ण ताकतीने हा प्रयोग सादर केल्याचं त्याने सांगितलं मात्र रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शासनाचे औदासिन्य पाहून आपण व्यथित झालो असल्याचं त्याने नमूद केलंय.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे संतापला पुष्कर श्रोत्री, व्हिडिओद्वारे व्यक्त केला संताप

हेही वाचा -कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम, रस्ते मात्र थर्ड क्लास; प्रशांत दामलेंची टीका

एवढ्यावरच न थांबता शासन या परिस्तितीबाबत दाखवत असलेलं औदासिन्य पाहून त्याने कडक शब्दात टीकाही केली आहे. मंत्रालय, पालिका मुख्यालय, वर्षा बांगला इथले रस्ते कधीच कसे खराब होत नाहीत मग आमच्याच घराजवळचे रस्ते कसे खराब होतात, याचाच अर्थ त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. रस्ते बांधणीतला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेच, पण एकदाच काय खायचे ते पैसे खा पण चांगले रस्ते तेवढे बनवून द्या, अशी कडवट टीकाही त्याने या व्हिडीओ द्वारे केली आहे.

सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का..?? आणि लोकांच्या प्रश्नाशी त्यांचं काही देणंघेणं आहे का.?? का फक्त दुसऱ्या पक्षातून लोक आणून आपल्या निवडणूक विजयाची सोय करणं एवढंच काम त्याना उरलं आहे, असा सवाल पुष्करने विचारला आहे.
रस्त्यांची दुर्दशा त्यात विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे बेशिस्त वाहनचालक यात एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. मात्र आपण काही करू शकलो नाही, याचं जास्त दुःख वाटल्याचं त्याने या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा -कोणी शाह, सुल्तान भारताची एकता तोडू शकत नाही - कमल हासन

पुष्करने आपली आपबिती या व्हिडीओ द्वारे सांगितली असली तरीही डोंबिवलीतील सर्वसामान्य माणूस या मरणयातना दररोज सहन करतोय. सर्वसामान्य माणसांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकून परिस्थिती तसूभरही बदललेली नाही. आता सेलिब्रिटीनी कान टोचल्यावर तरी यात काही फरक पडतो का ते पहायचं.

हेही वाचा -बोस्टन फिल्म फेस्टिव्हलमध्ये नीना गुप्ता यांना 'या' चित्रपटासाठी मिळाले २ पुरस्कार

Intro:Body:

'चांद्रयान-2' ला चंद्रावर सापडणार नाहीत एवढे खड्डे सध्या कल्याण- शीळ मार्गावर पडलेत. त्यामुळे डोंबिवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः नरकयातनाचा सामना करावा लागतोय. याबाबत काही दिवसांपूर्वी स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर परवा कल्याणमध्ये नाट्य प्रयोगासाठी आलेल्या प्रशांत दामले यांनी त्यावर पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली. तर याच शृंखलेत नव्या नावाची भर पडली आहे ती म्हणजे पुष्कर श्रोत्री याची.

पुष्करने आज त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. परवा रात्री साडे आठ वाजता पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या अ परफेक्ट मर्डर या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला आपल्याला सवा तीन तास लागले तर अभिनेता अनिकेत विश्वासराव याला सव्वा चार तास लागले. हे सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचं त्याने आपल्या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे. एवढं करून पूर्ण ताकतीने हा प्रयोग सादर केल्याचं त्याने सांगितलं मात्र रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शासनाचे औदासिन्य पाहून आपण व्यथित झालो असल्याचं त्याने नमूद केलंय. 

एवढ्यावरच न थांबता शासन या परिस्तिथीबाबत दाखवत असलेलं औदासिन्य पाहून त्याने कडक शब्दात टीकाही केली आहे. मंत्रालय, पालिका मुख्यालय, वर्षा बांगला इथले रस्ते कधीच कसे खराब होत नाहीत मग आमच्याच घराजवळचे रस्ते कसे खराब होतात याचाच अर्थ त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. रस्ते बांधणीतला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेच, पण एकदाच काय खायचे ते पैसे खा पण चांगले रस्ते तेवढे बनवून द्या अशी कडवट टीका त्याने या व्हिडीओ द्वारे केली आहे. 

सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का..?? आणि लोकांच्या प्रश्नाशी त्यांचं काही देणंघेणं आहे का.?? का फक्त दुसऱ्या पक्षातून लोक आणून आपल्या निवडणूक विजयाची सोय करणं एवढंच काम त्याना उरलं आहे असा सवाल पुष्करने विचारला आहे. 

रस्त्यांची दुर्दशा त्यात विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे बेशिस्त वाहनचालक यात एक रुग्णवाहिका अडकून पडली होती मात्र आपण काही करू शकलो नाही याचं जास्त दुःख वाटल्याचं त्याने या व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे. 

पुष्करने आपली आपबिती या व्हिडीओ द्वारे सांगितली असली तरीही डोंबिवलीतील सर्वसामान्य माणूस या मरणयातना दररोज सहन करतोय. सर्वसामान्य माणसांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकून परिस्थिती तसूभरही बदललेली नाही. आता सेलिब्रिटीनी कान टोचल्यावर तरी यात काही फरक पडतो का ते पहायचं.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.