कोरोना ओमायक्रॉन चा धोका जरी वाटत असला तरी शिथिल पडलेली चित्रपटसृष्टी जोमाने कामाला लागलेली आहे. नवीन चित्रपटांच्या घोषणा होताहेत तसेच बरेच चित्रपट परदेशी चित्रित होत आहे. मागील काही वर्षांपासून अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण इंग्लंड मध्ये झाले आहे. आता अजून एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा झालीय, तीही थेट स्कॉटलंड, यु के मधून. बॉलिवूड निर्माते आनंद पंडित आणि अभिनेता-निर्माता पुष्कर जोग यांनी स्कॉटलंडमध्ये मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” ची घोषणा केली. हा त्यांचा एकत्रितरित्या निर्मिती असलेला तिसरा चित्रपट असून नुकताच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला.
ती आणि ती, वेल डन बेबी या चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा व्हिक्टोरिया हा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांच्या प्रमुख भमिका आहेत. नवतारका हीरा सोहल ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे, तसेच जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शन पदार्पण करीत आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. अभिनेता पुष्कर जोग चा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी त्यांनी ‘ती आणि ती’, ‘तमाशा लाईव’ हे दोन चित्रपट केले आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंट चा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे.
आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशल शाह सह निर्माता आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे .
हेही वाचा - Inside Story Of Madipa's Revenge : '83' विश्वचषकात कपिल देव आणि मदनलालने असा घेतला रिचर्ड्सचा बदला