मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिचे वडील अशोक चोप्रा यांचे आज सहावे पुण्यस्मरण आहे. कॅन्सरमुळे त्याचे निधन झाले होते. त्यांच्या आठवणीत प्रियांका चोप्रा भावुक झालेली पाहायला मिळाली. तिने तिच्या वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अशोक चोप्रा यांचे २०१३ साली कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर प्रियांका खूप खचली होती. तिने वडिलांसोबत असलेला तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'जसं काही मी कालंच तुम्हाला गमावलं, पण या गोष्टीला पाहता पाहता ६ वर्षे झाली, मीस यू डॅड', असं कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे.

अशोक चोप्रा यांच्या वाढदिवशी देखील प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिच्या वडिलांसोबतच्या बऱ्याच आठवणी तिने शेअर केला होत्या.