मुंबई - अभिनेत्री-निर्माता प्रियंका चोप्रा जोनास द मॅट्रिक्सच्या चौथ्या भागात झळकणार आहे. वॉर्नर ब्रदर्स आणि व्हिलेज रोड शो या चित्रपटाचे दिग्दर्शन मालिका सह-निर्माता लाना वाचोस्की करत आहेत. या चित्रपटात ती हॉलिवूड स्टार कीनु रीव्हससोबत झळकणार आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा, कॅरी- अॅनी मॉस, याह्या अब्दुल-मतेन द्वितीय आणि नील पॅट्रिक हॅरिसबरोबर सामील होणार आहे.
प्रियंकाच्या व्यक्तिरेखेविषयीचे तपशील सध्या गुलदस्त्यात आहेत.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे चित्रपट उद्योगावर जगभर परिणाम झाला आहे. मॅट्रीक्स ४ या बहुचर्चित चित्रपटासाठी अजून आपल्याला दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मॅट्रीक्स ४च्या शूटिंगला सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे हे शूटिंग थांबले. यामुळे २०२१ मध्ये रिलीज होणारा हा चित्रपट आता २०२२मध्ये एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, उत्तर कॅलिफोर्नियामध्ये शूटिंग सुरू होण्यापूर्वी 'द मॅट्रिक्स 4' चित्रपटाच्या शूटसाठी फाइट सिक्वेन्सचे कठोर प्रशिक्षण घेण्यात आले.
वॉर्नर ब्रदर्स यांनी गेल्या ऑगस्टमध्ये जाहीर केले होते की, मॅट्रिक्स चित्रपटाच्या चौथ्या भागावर अधिकृतपणे काम करत आहे, रीव्हज आणि मॉस परत येत आहेत आणि लाना वाचोस्की लिहिण्यासाठी आणि दिग्दर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हेही वाचा - आपण स्वत: वर विश्वास ठेवल्यास जग आपल्यावर विश्वास ठेवेल - प्रियंका चोप्रा
प्रियांका यानंतर नेटफ्लिक्सच्या 'वी कॅन बी हीरो'मध्ये रॉबर्ट रॉड्रिग्जच्या मॅन बुकर प्राइज-विन-कादंबरी ‘द व्हाईट टायगर’वर आधारित वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. सध्या प्रियंका अॅमेझॉनबरोबर दोन टेलिव्हिजन प्रकल्पांवरही काम करत आहे. भारतीय विवाहातील संगीत या विषयावरील एक मालिका ती पती निक जोनाससोबत निर्माण करीत आहे. दुसरा प्रकल्प म्हणजे सिटाडेल, अँथनी आणि जो रुसोची गुप्तचर मालिका ज्यामध्ये प्रियंका रिचर्ड मॅडन यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे.