ETV Bharat / sitara

'सांस्कृतीक जग पोरके झाले', राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी गिरीश कर्नाड यांना वाहिली श्रद्धांजली - theater

त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'सांस्कृतीक जग पोरके झाले', राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी गिरीष कर्नाड यांना वाहिली श्रद्धांजली
author img

By

Published : Jun 10, 2019, 12:07 PM IST

Updated : Jun 10, 2019, 12:26 PM IST

मुंबई - प्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर लिहिलेय, की 'गिरीश कर्नाड यांच्या जाण्याने आज सांस्कृतीक क्षेत्र पोरके झाले आहे'.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'गिरीश कर्नाड नेहमीच सर्वच माध्यमातील अभिनयासाठी स्मरणात राहतील. त्यांचे काम येणाऱ्या काळात अधिक लोकप्रिय होत राहिल. त्यांच्या जाण्याने फार दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो', असे ट्विट त्यांनी केले आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासोबत कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Girish Karnad
गिरीष कर्नाड

नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, श्रृती हसन, जिग्नेश मेवानी, सिद्धार्थ, राकेश शर्मा, एस. एस. किम, सत्यजीत तांबे, सोनम कपूर, मधुर भांडारकर, गुलशन दवैय्या, फरहान अख्तर, अनिल कपूर, दिव्या दत्ता, यांनी सोशल मीडियावरुन कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिले, 'तुम्ही शिकवलेली मुल्य आणि दिलेले संस्कार कायम माझ्यासोबत राहातील'.
अभिनेता कमल हसन म्हणातात, 'तुम्ही जाताना अनेक लेखकांना तुमच्या लिखाणातून प्रेरणा देऊन गेलेत'. तर नाना पाटकरांनी लिहिलंय की, 'व्रतस्थ कलाकार हरवला'.

Intro:Body:

ent news 06

Conclusion:
Last Updated : Jun 10, 2019, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.