मुंबई - बाहुबली स्टार प्रभास त्याचा नुकत्याच रिलीज झालेल्या राधे श्याम चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून स्पेनला रवाना झाला आहे. असे वृत्त आहे की तो स्पेनमध्ये उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रभासच्या आगामी 'सलार' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता.
दुखापतीवर उपचार सुरू असताना त्याच्यावर बार्सिलोनामध्ये शस्त्रक्रिया झाल्याचे समजते. किरकोळ ऑपरेशन असूनही, डॉक्टरांनी पुढील तपासणी होईपर्यंत प्रभासला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. राधे श्यामला प्रेक्षकांचा प्रतिसाद स्पष्ट झाल्यानंतर, प्रभासच्या बहुतेक चाहत्यांना वाटले की त्यांचा नायक मीडियापासून दूर राहू इच्छित आहे. पण, प्रभासच्या शस्त्रक्रियेची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभास राधे श्याममध्ये मुख्य भूमिकेत आहे. एक हस्तरेखाकार जो एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्य दोन्ही शोधू शकतो, ही व्यक्तीरेखा त्याने साकारली होती. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडेने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
अभिनेता प्रभास आगामी काळात पुन्हा एकदा व्यग्र शुटिंग शेड्यूलमध्ये अडकणार आहे. तो बहुभाषिक पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष', 'सालार', 'प्रोजेक्ट-के', स्पिरिट आणि दिग्दर्शक मारुतीसोबतच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा - 'द काश्मीर फाइल्स'ने इतिहास रचला, बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली २'ची बरोबरी