ETV Bharat / sitara

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला प्रभास, आकडा ऐकून जाल चक्रावून - प्रभासचा 'आदिपुरुष'

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यानंतर, तेलुगु स्टार प्रभास हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून उदयास आला आहे. मीडियातील बातमीनुसार अभिनेता प्रभास त्याच्या आगामी पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष'साठी ₹ 150 कोटी घेणार आहे.

प्रभास
प्रभास
author img

By

Published : Nov 24, 2021, 7:58 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): अभिनेता प्रभासने (Actor Prabhas ) भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. बाहुबली (Bahubali)च्या यशानंतर या अभिनेत्याची कारकीर्द गगनाला भिडली आहे. त्याच्याकडे एकापाठोपाठ एक पॅन इंडिया चित्रपटांची रांग लागली आहे. मीडियातील बातमीनुसार अभिनेता प्रभास त्याच्या आगामी पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष' (mythological film Adipurush) साठी ₹ 150 कोटी घेणार आहे.

बाहुबली चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यश आणि लोकप्रियतेमुळे प्रभासला मोठ्या प्रमाणावर दशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अभिनेता आता त्याच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर आहे. चित्रपट निर्मात्यांना बजेटच्या बाबतीत त्याच्यासोबत मोठी जोखीम घेणे सुरक्षित वाटते. ताज्या अहवालानुसार, ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुषसाठी त्याला ₹150 कोटींची ऑफर मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही इतक्याच रक्कमेची ऑफर आहे.

प्रभास हा गेल्या 10 वर्षातील तिसरा अभिनेता आहे ज्याला 100 कोटीहून जास्त मानधन मिळाले आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार 100 कोटी मानधन घेतात. सलमानला सुलतान आणि टायगर जिंदा हैसाठी १०० कोटी रुपये मिळाले, तर अक्षयने बेल बॉटमपासून १०० कोटी रुपये कोट करण्यास सुरुवात केली.

'बाहुबली'ने प्रभासला राष्ट्रीय पातळीवर मोठा ब्रेक दिला, तर त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपट साहोने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवली नसली तरी त्याने आपली जादू कायम ठेवली. सध्या सर्वांच्या नजरा 'राधेश्याम', 'आदिपुरुष' आणि 'स्पिरीट'वर आहेत.

हेही वाचा - 'सुर्यवंशी'च्या यशानंतर रोहित शेट्टीने सांगितला 'सर्कस' रिलीजचा प्लान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.