ETV Bharat / sitara

पूजा सावंत आणि स्वप्नील जोशी ‘बळी’ साठी आले एकत्र ! - बळी

दिग्दर्शक विशाल पुरिया स्वप्नील जोशीला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन ‘बळी’ हा हॉरर चित्रपट बनवत आहेत. या निमित्ताने प्रथमच ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

pooja sawant
pooja sawant
author img

By

Published : Mar 26, 2021, 2:27 PM IST

दिग्दर्शक विशाल पुरिया स्वप्नील जोशीला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन ‘बळी’ हा हॉरर चित्रपट बनवीत आहेत. याआधी त्यांनी ‘लपाछपी’ हा चित्रपट बनविला होता, ज्याला अनेक पारितोषिकं मिळाली होती, ज्यात पूजा सावंत मध्यवर्ती भूमिकेत होती. आता पूजा आणि विशाल पुरिया ‘बळी’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आणि ‘बळी’च्या निमित्ताने पूजा सावंत आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'बोनस', 'सुभाष घई' यांचा हिंदी चित्रपट ‘विजेता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका करून स्वतःची अशी वेगळी छबी निर्माण केली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा सुखद अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. ‘बळी’ या आपल्या आगामी चित्रपटात ती वेगळी भूमिका साकारत आहे. ‘बळी’या चित्रपटाबद्दल त्यातील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींसाठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिली आहे. पूजाची त्यातील डॉक्टरची भूमिका हे या आतुरतेचे मुख्य एक कारण आहे.

स्वप्नीलसोबत काम करण्याचा अनुभ वेगळा
‘बळी’ मधील आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पूजा म्हणते, “विशाल पुरियाच्या दुसऱ्या चित्रपटात म्हणजे ‘बळी’मध्ये मी महत्वाच्या भूमिकेत आहे. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी काय करण्याची गरज आहे, याची परिपूर्ण कल्पना असलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची मजा काही औरच असते. तेच विशालच्या बाबतीत म्हणता येईल.या चित्रपटात काम करण्याचा आनंद दुहेरी होता. कारण मला या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वप्नील जोशीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वप्नील हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान असा कलाकार असून त्याच्याबरोबर काम करण्याची मला इच्छा होतीच.”

हेही वाचा -कृती सेनॉनला वाटले प्रभास 'लाजाळू' आहे, पण.

‘जीसिम्स’ने पूजाचे पूर्णाकृती छायाचित्र असलेले ‘बळी’चे एक नवे पोस्टर नुकतेच प्रकाशित केले आहे. या पोस्टरमध्ये तिच्या हातात स्टेथोस्कोप आहे आणि त्यावरून या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे ध्यानात येते. अत्यंत आश्वासक अशा तिच्या या लुकवरून प्रेक्षकांनाही या चित्रपटात आपल्याला दमदार अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार त्याही खात्री पटते. पूजाने आत्तापर्यंत आपल्या चाहत्यांना नेहमीच दमदार भूमिका आणि नाविन्यपूर्ण अभिनयाने जिंकले आहे.

पूजा सावंत पुढे म्हणाली, ‘‘बळी’मध्ये काम करण्याचे समाधान फार मोठे आहे ते दोन कारणांसाठी. एक म्हणजे, विशाल हा असा दिग्दर्शक आहे की जो अभिनेत्यामधील १०० टक्के क्षमतेचा वापर करून घेतो आणि दुसरे म्हणजे या चित्रपटात मी जी डॉक्टरची भूमिका करत आहे ती या कथेचा एक अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. विशालचा पहिला थ्रिलर चित्रपट ‘लपाछपी’हा खूप यशस्वी ठरला होता आणि त्यात दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी फारच उजवी झाली होती. ‘लपाछपी’मध्ये त्याची दिग्दर्शकीय क्षमता अगदी जवळून पहिली होती आणि त्यामुळे त्याने जेव्हा या चित्रपटासाठी विचारले तेव्हा नाही म्हणायचे काही करणाच नव्हते.’

हेही वाचा - ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

‘बळी’बद्दल बोलताना पूजा पुढे म्हणाली, “मला हॉरर चित्रपटांची खूप भीती वाटत असे. असे चित्रपट पाहताना पूर्वी मी दारे आणि खिडक्या उघड्या ठेवून ते पाहत असते. पण ‘लपाछपी’नंतर आता त्यात थोडासा बदल झाला आहे. आता मला अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचा तर आत्मविश्वास आलाच आहे पण त्याचबरोबर हॉरर चित्रपट मी आता बिनधास्तपणे पाहतेसुद्धा. ‘लपाछपी’ माझ्या चित्रपट कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट होता.”

‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला ‘बळी’ १६ एप्रिल २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.