ETV Bharat / sitara

'पीएम नरेंद्र मोदी'च ठरणार लॉकडाऊन नंतर थिएटर्समध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा - विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा सिनेमाच आता १५ ऑक्टोबर रोजी देशभरात पुन्हा रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरणार आहे.

PM Narendra Modi
पीएम नरेंद्र मोदी
author img

By

Published : Oct 10, 2020, 4:11 PM IST

मुंबई - ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा खाली पिली हा सिनेमा लॉकडाऊननंतर रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरेल असं आम्ही कालच तुम्हाला सांगितलं होतं. मात्र आता यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा सिनेमाच आता १५ ऑक्टोबर रोजी देशभरात पुन्हा रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरणार आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमात अभिनेता विवेकानंद ओबेरॉय हा मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची नऊ वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली होती. ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ यासारखे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या ओमंग कुमार याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आधी हा सिनेमा एप्रिल २०१९ मध्ये रिलीज होणार होता. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुका असल्याने या सिनेमाला कोर्टात खेचून त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ती रिलीज डेट २४ मार्च २०१९ अशी जाहीर करण्यात आली. २३ मार्च २०१९ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत आलं, त्यामुळे त्याचा या सिनेमाला फायदा होईल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात एवढा चांगला मुहूर्त मिळूनही या सिनेमाला म्हणावं तेवढं यश काही बॉक्स ऑफिसवर मिळालं नाही. त्यामुळेच या सिनेमाचे निर्माते सुरेश ओबॅरॉय, संदीप सिंग यांनी हा सिनेमा १५ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिनेमाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर एव्हाना रिलीज करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सिंगल स्क्रिन आणि मल्टीप्लेक्स थिएटर्स गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. नुकतंच केंद्र सरकारने ५० टक्के प्रेक्षक संख्येने थिएटर्स सुरू करायला परवानगी दिलेली आहे. मात्र तरिही कोरोनाच्या भितीमुळे किती प्रेक्षक प्रत्यक्ष सिनेमा पहायला येतात हा संभ्रम कायम आहे. याच भितीमुळे सध्या कोणताही निर्माता आपला सिनेमा लगेचच रिलीज करायला तयार नाही. त्यामुळे अशात पीएम नरेंद्र मोदी पुन्हा एकदा रिलीज झाला तर थिएटर मालकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे.

१५ ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरू करण्याचा निर्णय आल्या आल्या ‘झी स्टुडिओज’ने त्याचा इशान खट्टर आणि अनन्या पांडे अभिनित ‘खाली पिली’ हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज करायची घोषणा केली. हा सिनेमा १६ ऑक्टोबर रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येईल यासाठी खास पोस्टर रिलीज करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात हा सिनेमा आधी ‘झी सिनेप्लेक्स’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर रिलीज झाला असल्याने अनेक वितरकांनी हा सिनेमा थिएटर्समध्ये लावायला नकार दिला. अशात आता ‘पीएम नरेंद्र मोदी’ला मात्र असा विरोध होणं शक्य नसल्याने ‘खाली पिली’ ऐवजी हाच सिनेमा लॉक़डाऊन नंतर थिएटर्समध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.