ETV Bharat / sitara

सायनाच्या बायोपिकसाठी परिनीती करतेय अशी मेहनत, शेअर केला फोटो - Parineeti chopra upcomming films

परिणीती ४-५ महिन्यांपासून या चित्रपटाची तयारी करत आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. विविध ठिकाणी हा चित्रपट शूट करण्यात येणार आहे.

सायनाच्या बायोपिकसाठी परिनीती करतेय अशी मेहनत, शेअर केला फोटो
author img

By

Published : Oct 5, 2019, 12:39 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याच्या बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री परिनीती चोप्रा ही यामध्ये सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती बॅडमिंटनचे धडे घेत आहे. या चित्रपटाचे अपडेट्सही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या चित्रपटासाठी ती सध्या कशाप्रकारे मेहनत घेतेय, त्याचा एक फोटो तिने शेअर केला आहे.

परिणीती ४-५ महिन्यांपासून या चित्रपटाची तयारी करत आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. विविध ठिकाणी हा चित्रपट शूट करण्यात येणार आहे.

हेही वाचा -विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' बायोपिकमध्ये 'दंगल गर्ल' साकारणार 'ही' भूमिका

काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या आगामी 'द - गर्ल ऑन द ट्रेन'ची शूटिंग पूर्ण केली आहे. या चित्रपटातील लूकही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

यंदा अक्षय कुमारसोबत ती 'केसरी' चित्रपटात झळकली. याशिवाय, सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'जबरिया जोडी'मध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. आता बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या रुपातही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची सुवर्णमंदिराला भेट

Intro:Body:

Grenade attack outside deputy commissioner's office in Anantnag

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.