ETV Bharat / sitara

हसवणुकीचा धंदा जोमानं सुरू ठेवण्यासाठी येतोय 'पांडू'!

दिग्दर्शक विजू माने यांच्या 'पांडू' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरूवात झाली आहे. झी स्टुडिओजकडून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

हसवणुकीचा धंदा जोमानं सुरू ठेवण्यासाठी येतोय 'पांडू'!
हसवणुकीचा धंदा जोमानं सुरू ठेवण्यासाठी येतोय 'पांडू'!
author img

By

Published : Jan 19, 2021, 11:01 AM IST

मुंबई - हास्यसम्राट दादा कोंडके यांचा ‘पांडू हवालदार’ आजही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान टिकवून आहे. त्या चित्रपटातील दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्या विनोदाची जुगलबंदी आजही आबालवृद्धांना हसवते. तशाच विनोदाची ग्वाही देत दिग्दर्शक विजू माने घेऊन येत आहेत ‘पांडू’ ज्याची निर्मिती केली आहे झी स्टुडीओजने.

viju mane
विजू माने या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत
नव्या वर्षाची सुरूवात झाली आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण दिसू लागलं. प्रत्येक जण उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. ही सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी उमेद घेऊन आली आहे हे नक्की. नुकतीच झी स्टुडीओज निर्मित 'पांडू' ह्या चित्रपटाच्या शूटींगला मुंबईमध्ये सुरुवात झाली. विजू माने चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून चित्रपटाला उत्तम स्टारकास्ट लाभली आहे. सरतं वर्ष सगळ्यांसाठीच कठीण होतं पण आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करायला सज्ज होत आहे.या निमित्ताने झी स्टुडीओज मराठी फिल्म डिव्हिजनचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले, "२०२१ ची सकारात्मक आणि उत्साहात सुरुवात झालीये. गेली अनेक वर्षे, नवीन वर्ष आणि झी स्टुडिओजचा नवा सिनेमा हा पायंडाच आहे पण या वर्षाचा श्रीगणेशा, धमाल विनोदी आणि मनोरंजनाने भरलेल्या 'पांडू' च्या शूटनं करतोय. २०२१ मध्ये खूप काम करायचंय, त्याचबरोबर आधी पूर्ण केलेलं कामही या वर्षात लोकांसमोर यावं, अशी अपेक्षा आहे. लॉकडाऊनमध्ये एका सिनेमाचं शूट होऊन तो पूर्ण सुद्धा झालाय. वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट यावर्षात प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. लवकरच सिनेमाचा मोठा पडदा झळाळून उठेल हे नक्की."दिग्दर्शक विजू माने म्हणाले,"हसणं आणि हसवणं हा सगळ्यात आरोग्यदायी उद्योग आहे असा मला नुकताच शोध लागलाय. तेव्हा यंदाचं वर्ष नव्हे तर येत्या सगळ्या वर्षात हसवणुकीचा धंदा जोमानं सुरू ठेवायचा असा विचार आहे. त्याच उद्देशाने ह्या आगामी सिनेमाचं काम सुरू केलंय. हसत राहूया, हसवत राहूया, निरोगी राहूया. जय चार्ली चॅप्लिन, जय पु. ल. देशपांडे, जय दादा कोंडके! जय महाराष्ट्र!!!"‘पांडू’ या चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात असल्याने नक्की कोण कलाकार चित्रपटात आहेत हे पाहणे औतसुक्याचे ठरेल.

हेही वाचा - स्त्रीप्रधान ‘त्रिभंग’ बद्दल काजोल म्हणते, ‘हा चित्रपट स्त्रीत्व आणि मातृत्व साजरे करतो’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.