मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ दोघेही लवकरच पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ आनंद आणि वाणी कपूर त्यांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात टायगर आणि हृतिकसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. तर, या चित्रपटात 'पद्मावत' चित्रपटातील अनुप्रिया गोयंका ही अभिनेत्री झळकणार असल्याचे समोर आले आहेत.
अनुप्रिया गोयंका हिने 'पद्मावत' चित्रपटात शाहिद कपूरची पहिली पत्नी 'नागमती' हिची भूमिका साकारली होती. हृतिक आणि टायगर सोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळत असल्याने फार आनंदी असल्याचे तिने सांगितले आहे. यापूर्वी यश राज फिल्म्स अंतर्गत अनुप्रियाने 'टायगर जिंदा है' या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती दुसऱ्यांदा यश राज फिल्म्स अंतर्गत काम करत आहे. यासोबतच अनुप्रियाने आदित्य चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद यांचेही आभार मानले आहेत.
या चित्रपटाचे नाव अद्याप तरी ठरलेले नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नाव 'फायटर्स' असे सांगण्यात आले होते. या चित्रपटात टायगर आणि हृतिक एकत्र झळकणार म्हटल्यावर चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.