मुंबई - सोशल मीडियावर कधी काय ट्रेण्ड होईल काही सांगता येत नाही. सध्या 'बॉटल कॅप चॅलेंज'ही असंच सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. अलिकडेच अक्षय कुमारच्या एका व्हिडिओमुळे हे चॅलेंज चर्चेत आलं. कलाविश्वातील इतरही कलाकार हे आव्हान स्वीकारण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. आता सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल या लव्हबर्ड्सनेही हे चॅलेंज अनोख्या अंदाजात स्वीकारले आहे. या चॅलेंजमध्ये सुष्मिताच्या दोन दत्तक मुली रेने आणि अलिशा यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे हे चॅलेंज एकप्रकारचे फॅमिली अॅक्ट झाले आहे.
सुष्मिताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मितासह तिच्या दोन्ही मुली आणि रोहमन शॉलदेखील आपल्या किकने बॉटलचे झाकण उडवताना दिसत आहेत. सुष्मिता आणि रोहमनच्या या व्हिडिओवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुष्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या चर्चा माध्यमांत रंगल्या होत्या. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे.