मुंबई - प्रख्यात अभिनेता मनोज बाजपेयी यांनी पत्नी शबाना आणि मुलगी अवा यांच्यासह गोव्यात नवीन वर्षाचे स्वागत केले. येत्या नवीन वर्षापासून त्याला कोणतीही आशा नाही असे त्यांनी म्हटलंय.
अभिनेता मनोज बाजपेयी म्हणाले, "मी गेल्या तीन महिन्यांपासून सकाळी सात ते संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत होतो. त्यामुळे मला थोडासा ब्रेक हवा होता. मी पुन्हा एका दिवसात परत जाईन. माझ्या कुटुंबाला गोव्यात राहणे आवडते, म्हणून येथे आलो. "
ते पुढे म्हणाले, "नवीन वर्षापासून काही अपेक्षा नाही. पुढे जात रहा आणि येणाऱ्या काळानुसार जगत राहा, हे जास्त चांगले आहे. मी आयुष्य आणि व्यक्तीरेखा यांना चांगल्या क्षमतेसह जगण्याची इच्छा बाळगतो."
मनोज बाजपेयी यांचे आगामी प्रोजेक्ट
मनोज बाजपेयी अलिकडेच रिलीज झालेल्या 'सूरज पे मंगल भारी'मध्ये झळकले होते. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि फातिमा सना शेख या कलाकारांचीही भूमिका आहेत. त्यानंतर ते 'द फॅमिली मॅन' च्या दुसर्या सीझनमध्ये दिसणार आहेत. यामध्ये समांथा अक्किनेनी, शरद केळकर यांच्यासह प्रियामणि, शरिब हाश्मी, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि मेहक ठाकूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका