मुंबई - सियाचिनमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या विषयावर 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाची निर्मिती अश्विनी अय्यर आणि नितेश तिवारी करणार आहेत.
या चित्रपटात २१००० फूट उंचीवर बर्फामध्ये भारतीय सैनिक कशा पध्दतीने देशासाठी संघर्ष करतात हा थरार चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय शेखर शेट्टी करणार आहेत.
याबद्दल बोलताना नितेश तिवारी यांनी सांगितले, 'सियाचिन वॉरियर्स' या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या बहाद्दुरांना श्रध्दांजली अर्पण करणार आहे. सियाचीनची कथा प्रेरणादायी असण्यासोबतच बहाद्दुरी, देशभक्ती आणि प्रेमाची परिभाष अधोरेखीत करेल. आपल्या वर्दीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि आपले संरक्षण करणाऱ्या जांबाज सैनिकांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विषय पोहोचेल.
या चित्रपटाचे लेखन पियूष गुप्ता आणि गौतम वेद यांनी केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ट्रेड अ्ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाची माहिती देत नितेश तिवारी आणि त्यांची पत्नी अश्विनी यांचा फोटो शेअर करीत दिली आहे.
पंगा या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर अश्विनी अय्यर यांनी या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. नितेश यांनी २०१९ मध्ये छिछोरे हा चित्रपट बनवला होता.