मुंबई - आजकाल बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार होत आहेत. यामध्ये बायोपिक, क्रीडा, सामाजिक विषय यांसारख्या विषयांवर अधिक भर दिला जात आहे. भारतीय सैन्यावर आधारितही बरेच चित्रपट आजवर आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, सियाचीन येथील सैनिकांवर आधारित चित्रपट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि 'पंगा'च्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी एकत्र आले आहेत.
अश्विनी अय्यर या नितेश तिवारी यांच्या पत्नी आहेत. अलिकडेच त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'पंगा' चित्रपट प्रदर्शित झाला. महिला कबड्डी खेळाडूवर आधारित हा चित्रपट होता. काही दिवसांपूर्वीच नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी यांनी सुधा आणि नारायण मुर्ती यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आता 'सियाचीन वॉरिअर्स' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'बागी ३' च्या पहिल्या पोस्टरमध्ये टायगरचा दमदार अवतार, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
महावीर जैन यांच्यासोबत मिळून ते या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, संजय शेखर शेट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पियुष गुप्ता आणि गौतम वैद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
-
IT'S OFFICIAL... After announcing #NarayanaMurthy - #SudhaMurthy biopic, Nitesh Tiwari and Ashwiny Iyer Tiwari reunite with producer Mahaveer Jain... Announce #SiachenWarriors [working title]... Directed by ad filmmaker Sanjay Shekhar Shetty. pic.twitter.com/pZfAanusNj
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... After announcing #NarayanaMurthy - #SudhaMurthy biopic, Nitesh Tiwari and Ashwiny Iyer Tiwari reunite with producer Mahaveer Jain... Announce #SiachenWarriors [working title]... Directed by ad filmmaker Sanjay Shekhar Shetty. pic.twitter.com/pZfAanusNj
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020IT'S OFFICIAL... After announcing #NarayanaMurthy - #SudhaMurthy biopic, Nitesh Tiwari and Ashwiny Iyer Tiwari reunite with producer Mahaveer Jain... Announce #SiachenWarriors [working title]... Directed by ad filmmaker Sanjay Shekhar Shetty. pic.twitter.com/pZfAanusNj
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020
हेही वाचा -'थप्पड'च्या ट्रेलरला १० मिलियन व्ह्युज, तापसीने शेअर केला व्हिडिओ