लंडन - पॉप स्टार निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रासमवेत आगामी हॉलिवूडच्या 'टेक्स्ट फॉर यू' या रोमँटिक चित्रपटामध्ये झळकणार आहे. डेलीमेल डॉट कॉमच्या वृत्तानुसार निकला प्रियंकाबरोबर लंडनमधील कॅबमध्ये चित्रपटाचे शूटिंग करताना पाहिले होते, त्यानंतर ही बातमी पसरली.
ही जोडी तणावाचा सीन शूट करत होती आणि प्रियंकाला गाडीतून बाहेर पडण्यास सांगताना निक दिसला होता. यावेळी प्रियंका त्याला अपशब्द वापरताना दिसली होती. त्यानंतर निक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडलेला दिसला होता.
हेही वाचा - नेटफ्लिक्सच्या 'एके व्हर्सेस एके'मधील गणवेशावर आणि भाषेवर वायू दलाचा आक्षेप
जिम स्ट्रॉस लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट सोफी क्रॅमरच्या कादंबरीवर आधारित आहे. 'एसएमएस फर डिच' या जर्मन भाषेतील चित्रपटाचा हा इंग्रजी रिमेक आहे. या चित्रपटात सॅम हेगनसुद्धा आहे.
हेही वाचा - सैफच्या 'भूत पुलिस' चे शुटिंग आटोपले, करिनाने हिमाचलचा घेतला निरोप