मुंबई - डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सर्वांना नववर्षाची चाहूल लागलेली असते. सरत्या वर्षाने आपल्याला काय काय दिले? यावर आपण एक नजर टाकत असतो. मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झालेले असतात. 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमामध्ये देखील नववर्षाचे जल्लोषात स्वागत होणार आहे. विशेष म्हणजे मालिकांमधील कलाकारांसोबत हा कार्यक्रम रंगणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर 'बाळूमामाच्या नावाने चांगभलं' आणि 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत. गाण्यांच्या सुरेल मैफिलीसोबतच सर्वांचा लाडका मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळची शाळादेखील भरणार आहे.
हेही वाचा -Flashback 2019 : आघाडीच्या नायकांना आयुष्मान खुरानाची दमदार टक्कर
या कार्यक्रमातील सुरवीरांसोबतच 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील अजित ढाले पाटील यांची भूमिका साकारणाऱ्या अजय पूरकर आणि मिनाक्षी राठोड यांचीही गाणी ऐकायला मिळणार आहेत. तसेच हर्षद 'डॉन' चित्रपटातील 'खाईके पान बनारसवाला' हे गाणं गाताना दिसणार आहे. 'डॉन'मधील अमिताभ बच्चन यांच्या लूकप्रमाणेच त्याचा लूक पाहायला मिळणार आहे. ३१ डिसेंबरला हा विशेष भाग प्रसारित होणार आहे.
हेही वाचा -बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर