मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर लवकरच 'सांड की आँख' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता यापाठोपाठ चित्रपटाचं आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तापसी आणि भूमी वडाच्या पारंब्यांना झुला घेताना दिसत आहेत. मात्र, पहिल्या फोटोप्रमाणेच या फोटोतही तापसी आणि भूमीचा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. पारंपारिक वेशभूषेत या दोघेही दिसत आहेत.
From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/lEiuQn6fz8
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/lEiuQn6fz8
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019From the sets of #SaandKiAankh... Stars Taapsee Pannu, Bhumi Pednekar, Vineet Singh and Prakash Jha... Directed by Tushar Hiranandani... Produced by Reliance Entertainment, Anurag Kashyap and Nidhi Parmar. pic.twitter.com/lEiuQn6fz8
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2019
जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या चित्रपटाची कथा आधारित असणार असून तापसी चित्रपटात या महिलेची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे याच्या चित्रीकरणासाठी तापसी आणि भूमी एका छोट्याशा गावात गेल्या आहेत. चित्रपटाचा बहुतेक भाग याच गावात शूट होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत.