चेन्नई - तामिळ अभिनेत्री रेखाने १९८६ मध्ये 'पुन्नागई मन्नान' चित्रपटाच्या शूटिंग प्रसंगी तिला न विचारता कमल हासनने चुंबन घेतल्याचा खुलासा मुलाखतीत केला आहे. यानंतर इंटरनेट युजर्सनी हासन यांच्यावर टीकास्त्र डागत रेखाची माफी मागण्याचा आग्रह धरलाय.
अभिनेत्री रेखा त्यावेळी १६ वर्षाची होती. 'पुन्नागई मन्नान' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ख्यातनाम दिग्दर्शक के. बालचंदर यांनी चुंबनाचा सीन न सांगताच घेतला असा तिचा दावा आहे. कमल हासन आणि के. बालचंदर यांनी तिची यावेळी फसवणूक केल्याचे तिचे म्हणणे आहे.
रेखाने याबद्दल बोलताना सांगितले की, तिने ही गोष्ट १०० वेळा सांगितलीय की तिला न विचारता हा सीन शूट झाला होता. याच प्रश्नाने वैतागल्याचेही तिने सांगितले.
ती म्हणाली, ''हे चुंबन दृष्य पडद्यावर घाणेरडे किंवा जबरदस्तीने घेतल्याचे दिसत नव्हते. त्या सीनची आवश्यकता होती, मात्र मी लहान मुलगी होते. आणि मला याबद्दल माहिती नव्हते. त्यांनी ( के. बालचंदर ) म्हणाले, 'कमल, तुझे डोळे बंद कर, तुला आठवतंय ना मी काय सांगितलंय, ठिक आहे?' नंतर कमल यांनी हो म्हटले. नंतर १...२...३...सोबतच उडी मारायची होती. आम्ही चुंबन घेतले आणि उडी मारली. मी जेव्हा थिएटरमध्ये पाहिले तेव्हा याचा परिणाम किती होता हे लक्षात आले.''
त्यावेळी रेखा १६ वर्षाची होती आणि १० वी पासनंतर ती सिनेमात काम करत होती. हा सीन सेन्सॉरमध्ये कट होईल, असे तिला सांगण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.
तिच्या म्हणण्यानुसार तिची संमती नसताना हा सीन सूट झाला होता आणि याची कल्पना कमल हासन यांना होती. हे आपल्याला अगोदर माहिती असते तर सीनला संमती दिली नसती, असे तिचे म्हणणे आहे.