मुंबई - बॉलिवूड आयकॉन अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा हिची स्वतंत्र अशी एक ओळख निर्माण झाली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिच्या आईबद्दल ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला तिने तितक्याच नम्रपणे आणि ठामपणे उत्तर दिले आहे.
नुकत्याच झालेल्या एका मासिकाच्या मुलाखतीत नव्याने सांगितले की, कौटुंबिक व्यवसायात पुढाकार घेणारी ती पहिली महिला असेल. आजच्या काळात महिलांनी आघाडी घेण्याचे महत्त्व सांगून तिचा आजोबा एचपी नंदा यांना अभिमान वाटेल असी इच्छा तिने व्यक्त केली.
नव्या हिने महिला सशक्तीकरण प्रकल्पाबद्दल बोलताना सांगितले की, कुटुंबातील आसपास काम करणार्या महिला पाहून तिला प्रेरणा मिळाली. त्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर ती आली. एका ट्रोलरने तिला प्रश्न केला की, तिची आई काय करते?
न्यूयॉर्कच्या फोर्डहॅम युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त झालेल्या नव्याने याला केवळ नम्र आणि तितकीच ठाम प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्राम स्टोरीवर 'माता व पत्नी' साठी एक महत्त्वाचा आणि सशक्त संदेश देखील शेअर केला. नव्याने ट्रोलला उत्तर दिले आणि लिहिले की, "@ तारकौरसिंग 2 ती एक लेखिका, डिझाइनर, पत्नी आणि आई आहे." पुढे, तिने एक टीप देखील लिहिली की आई होणे ही एक पूर्ण-वेळची नोकरी आहे आणि या स्त्रियांना कोणी बदनाम करु नये.
२३ वर्षीय नव्या नवेली नंदा तिच्या लैंगिक समानतेच्या ध्येयासाठी सामाजिक प्रकल्पावर काम करीत आहे.
हेही वाचा - लूप लपेटा’मध्ये रोमँटिक शैलीत तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन!