ETV Bharat / sitara

पाहा, थरारक अॅक्शन, नेत्रदिपक दृष्ये आणि वेड लावणारी भव्यता असलेला 'सैरा'चा ट्रेलर - SyeRa Narsimha Reddy trailer release

बहुप्रतीक्षित सैरा चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सैरा नरसिम्हा रेड्डी हा चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल. रितेश सिध्दवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाचे हिंदीमध्ये वितरण करणार आहेत.

'सैरा'चा ट्रेलर
author img

By

Published : Sep 18, 2019, 5:36 PM IST

Updated : Sep 18, 2019, 6:42 PM IST

हैदराबाद - दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांचा दमदार अभिनय असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली होती. ट्रेलर पाहून ही उत्कंठा शिगेला पोहोचेल हे निश्चित.

आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणााऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे. सुरेंद्र रेड्डी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राम चरण या चित्रपटाचा निर्माता आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटाचे शूटींग गेली ३ वर्षे सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यातील फाईटच्या एका सीनसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो.

सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदिप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांची यात विशेष भूमिका असेल. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.