मुंबई - ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांना “सौम्य कोविड” ची लक्षणे आढळून आल्यानंतर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांची मुलगी आणि गायिका रेमा लाहिरी बन्सल यांनी सांगितली. त्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात बप्पी लाहिरी यांना खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याचे म्हटले आहे.
"बप्पी दा यांनी अत्यंत सावधगिरी बाळगली होती. परंतु त्यांना कोविडची सौम्य लक्षणे आढळली आहेत. वय वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉ. उडवाडिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रेमा लाहिरी बन्सल यांनी निवेदनात म्हटले आहे की, "ते लवकरच बरे होतील व घरी परततील. त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार."