ETV Bharat / sitara

'रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात मोनालिसा बागल!

author img

By

Published : Aug 25, 2021, 6:46 PM IST

'रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

'रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात मोनालिसा बागल!
'रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात मोनालिसा बागल!

शशिकांत पवार निर्मित 'रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता अधिक न वाढवत ठेवता निर्मात्यांनी जाहीर केले की या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या बहुचर्चित, महत्वकांक्षी सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा, शंभू महादेवाच्या साक्षीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीत पार पडला. या प्रसंगी प्रताप गंगावणे, अनुपजी जगदाळे, अभिनेत्री मोनालिसा बागल, 'थोर इतिहासकार भोर'चे दत्ताजी जगदाळे साहेब, उद्योजक मंगेश दादा जाधव, अभिनेत्री अश्विनी बागल, 'धर्मवीर युवा मंच'चे अध्यक्ष प्रशांत नलावडे, निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.

श्री क्षेत्र रायरेश्वर हे तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र,पांडवकालीन जागृत देवस्थान होय. भोर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यात असलेले, साताऱ्यातील वाईपासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने, बाल शिवाजींनी आपल्या १२ सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ २६ एप्रिल १६४५ रोजी घेतली.

हे सांगण्याचे विशेष कारण म्हणजे आगामी मराठी सिनेमा "रावरंभा" ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिला ऐतिहासिक सिनेमा. पटकथा संवाद लेखन प्रताप गंगावणे यांचे असून, अनुपजी जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. सातारा शहरातील आणि भारतातील प्रसिद्ध टॉप गियर ट्रान्समिशन प्रा. ली. चे संचालक शशिकांत शिला भाऊसाहेब पवार हे शशिकांत पवार प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेद्वारे या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

या चित्रपटात अनेक नामवंत कलाकार असून त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होत असून 'रावरंभा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - ‘पोन्नीयन सेल्वान’मध्ये महाराणीच्या अवतारात दिसणार ऐश्वर्या राय, 'शाही लूक' झाला लीक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.