मनाली - हिमाचल प्रदेशचे वन तसेच क्रीडा मंत्री गोविंद सिंग ठाकुर यांनी बुधवारी (४ डिसेंबर) मनाली येथे महानायक अमिताभ बच्चन यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. आपल्या आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिग बी मनाली येथे रवाना झाले आहेत. यावेळी गोविंद सिंग यांनी त्यांना कुल्लवी टोपी, शॉल आणि स्मृती चिन्ह भेट देऊन त्यांचे आदरातिथ्य केले.
हेही वाचा -मनालीच्या चाहत्यांसाठी बिग बींची खास पोस्ट
गोविंद सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी चित्रपटाबाबत संवादही साधला. तसेच. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतही चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून मनालीच्या कडाक्याच्या थंडीत 'ब्रम्हास्त्र'चे शूटिंग सुरू आहे. मनाली आणि आसपासच्या परिसरात काही भाग शूट करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांनीदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट