ETV Bharat / sitara

मिलिंद कवडे-प्रथमेश परब जोडी 'एक नंबर... सुपर' मधून पुन्हा एकत्र!

author img

By

Published : Feb 26, 2022, 7:43 PM IST

मिलिंद कवडे-प्रथमेश परब ही अभिनेता दिग्दर्शकाची जोडी 'एक नंबर... सुपर' मधून पुन्हा एकत्र आली आहे. टायटलप्रमाणेच ‘एक नंबर’ कथानक असणाऱ्या 'एक नंबर... सुपर' चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला. येत्या ११ मार्च २०२२ रोजी 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक नंबर... सुपर
एक नंबर... सुपर

२०१९ च्या मध्यावर प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या मराठी चित्रपटाने अनपेक्षितपणे तिकीटबारीवर भरमसाठ गल्ला जमविला. दोन वर्षांपूर्वा मराठी चित्रपटांच्या तिकिटबारीवर दुष्काळ असताना ‘टकाटक’सारखा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यशस्वीपणे जबरदस्त धंदा करत प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं. त्यानंतर ‘टकाटक २’ हा त्या चित्रपटाचा सिक्वेल येतोय. परंतु त्याआधी ‘टकाटक’ चे दिग्दर्शक अजून एक विनोदी सिनेमा घेऊन येताहेत, 'एक नंबर... सुपर'. समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर विनोदी अंगानं सादर करत रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेले दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. टायटलप्रमाणेच ‘एक नंबर’ कथानक असणाऱ्या 'एक नंबर... सुपर' चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला.

एक नंबर... सुपर टीम
एक नंबर... सुपर टीम

काहीशा वेगळ्या जॅानरच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे एखादा विचार देणाऱ्या मिलिंद यांच्या कारकिर्दीतील 'एक नंबर... सुपर' हा आणखी एक वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे. टायटलप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलरही 'एक नंबर' बनला आहे. 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करणारा आहे. 'टकाटक' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर मिलिंद कवडे यांचा 'एक नंबर... सुपर' हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

'एक नंबर... सुपर' या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. या चित्रपटातील 'बाबूराव...' आणि 'तुकडे तुकडे...' ही गाणी अगोदरच पॅाप्युलर झाली असून याचा फायदा ट्रेलर 'एक नंबर... सुपर'ला नक्कीच होणार असं मानलं जातंय.

दिग्दर्शनासोबत 'एक नंबर'ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे, तर संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, श्रवणीय संगीत, मार्मिक संवाद, नयनरम्य लोकेशन्स आणि विषयाचं गांभीर्य अधोरेखित करणारा हा ट्रेलर आहे. संजय नवगिरे आणि सुनिल मगरे या चित्रपटाचे पटकथा सहाय्यक आहेत. सिनेमॅटोग्राफर हजरत शेख (वली) यांच्या नजरेतून हा चित्रपट पहायला मिळणार आहे. अभिनय जगताप यांनी या चित्रपटाचं बँग्राऊंड म्युझिक दिलं असून, संकलनाची जबाबदारी प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे.

'टकाटक'नंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रथमेश परबचीच निवड केली आहे. त्यामुळं या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिलिंद-प्रथमेश जोडीची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. प्रथमेशच्या जोडीला यात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी अशी भलीमोठी मराठी कलाकारांची फौज आहे.

येत्या ११ मार्च २०२२ रोजी 'एक नंबर... सुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'ला रणबीर कपूरने कसा प्रतिसाद दिला? आलिया भट्टने दिले उत्तर पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.