ETV Bharat / sitara

मायली सायरस फॅन्सचा वेडेपणा, गर्दीत चुंबन घेण्याचा प्रयत्न

फॅन्सचा वेडेपणा वाढतो तेव्हा सेलेब्रिटीजचे जगणे मुश्किल होऊन जाते. मायली सायरसच्या बाबतीत असाच प्रकार घडला.

मायली सायरस
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:20 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा विचार केला तर आपल्याकडे सेलेब्रीटीजचे लक्ष वेधून घेण्यासाठी चाहते अनेक क्लृप्त्या करीत असतात. मात्र कधी कधी ही गोष्ट अडचणीची ठरते. हाच अनुभव मायली सायरसला आला.

हॉलिवूड सिंगर आणि अभिनेत्री मायली सायरस हिला एका सनकी फॅन्सचा सामना करावा लागला. ती बार्सिलोना शहरात पती लियाम हेम्सवर्थ याच्यासोबत हॉटेलमधून बाहेर पडली. त्यावेळी एका चाहत्याने तिला गाठले आणि आणि जबरदस्तीने तिचे चुंबनही घेण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मायली बार्सिलोनाला परफॉर्मन्स देण्यासाठी पोहोचली होती. ती जेव्हा पतीसोबत हॉटेलमधून बाहेर पडली तेव्हा मीडिया आणि चाहत्यांनी मोठी गर्दी करत तिला घेरले. यातून बाहेर काढण्यासाठी बॉडी गार्ड्स तिच्या मदतीला धावले.

या गर्दीतून वाट काढत जेव्हा हे सेलेब्रिटी कपल जेव्हा निघाले होते, तेव्हा एका व्यक्तीने मायलीचे मागून केस ओढत तिला जवळ खेचण्याचा आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला धक्का देत स्वतःला सोडवून घेतले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मायलीच्या पतीने तिला आपल्याकडे ओढत तिला चाहत्यांमधून सुखरुप बाहेर काढल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओनंतर लोकांनी त्या व्यक्तीवर टीकेचा भडीमार केला आहे. मायलीलाही सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा सल्ला अनेकांनी दिलाय.

Intro:तुनश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांनी अभिनेते नाना पाटेकर याना क्लीन चिट दिली आहे. सकृतदर्शनी नाना पाटेकर यांनी तनुश्रीच लैगिक शोषण केल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याने अंधेरी कोर्टात सादर केलेल्या बी समरी रिपोर्ट मध्ये मुंबई पोलिसांनी नानाला निर्दोष ठरवलं आहे.

हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या सेटवर आयटम सॉंगच्या शुटिंग दरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने एका खाजगी वाहिनीशी बोलताना केला होता. परदेशात जरी मी तू मोहीम यशस्वी झाली असली तरीही भारतात ते शक्य नाही असं म्हणत 2008 साली घडलेल्या या प्रसंगाबाबत तिने पुन्हा एकदा मौन सोडलं. त्यांतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात मी तू मोहीम सुरू झाली. या मोहिमेचा वणवा पेटल्यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या विरोधात अंधेरीतील ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. या प्रकरणी अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले. मात्र यातील एकानेही नानाने तनुश्रीसोबत नक्की कोणतं असभ्य वर्तन केलं ते पोलिसांना सांगू शकलं नाही. त्यामुळेच चौकशीअंती आरोपात तथ्य आढळलं नसल्याने तस कोर्टात सादर करण्यात आलेल्या बी समरी रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या रिपोर्ट न्यायालयाने ग्राह्य धरला तर नानाची लवकरच या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होऊ शकते. त्यासोबतच तनुश्रीचे वकील याबाबत नक्की काय भूमिका घेतात ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

नानावर झालेल्या या आरोपामुळे नानाला हाऊस फुल्ल 4 सारख्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तसच अनेक काम त्याला हातची गमवावी लागली होती. एवढंच नाही तर कलाकारांची संघटना असलेल्या सिंटाने याबाबत त्याच्याकडे स्पष्टीकरण मागवलं होत. मात्र आता न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केल तर त्याचा इंडस्ट्रीत परतण्याचा मार्ग मोकळा होईल.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.