हैदराबाद - तामिळ सुपरस्टार्स विजय आणि विजय सेतूपती यांच्या प्रमुख भूमिका असलेला मास्टर चित्रपटाची चर्चा पुन्हा जोरदार सुरू झाली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असल्यामुळे ही चर्चा नाही तर यातील एक सीन डिलीट झाल्यामुळे आहे. तरुण अभिनेत्री गौरी किशनने हा सीन खराब केल्याची टीका नेटिझन्स करीत आहेत.
६ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइमने मास्टर चित्रपटातून हटवलेला सीन्स चाहत्यांसमोर ठेवला. एक विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्यानंतर चित्रपटात जेडीची भूमिका करणारा विजय दोषींना योग्य शिक्षा व्हावी यासाठी आक्रमक होतो त्या प्रसंगाचा हा सीन आहे.
मास्टर चित्रपटात नसलेला हा सीन चांगलाच लोकप्रिय झाला आहे. १० लाख लोकांनी आतापर्यंत हा सीन पाहिला आहे. हा सीन व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हा सीन का कट केला यावर मते मांडण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियातील काही जणांनी याला अभिनेत्री गौरी किशन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या सीनमधील गौरीचा स्क्रिन शॉट नेटिझन्सनी शेअर केला असून त्यात गौरी हसत असल्याचा दावा केलाय.
लोकेश कानगराज दिग्दर्शित या मास्टर चित्रपटामध्ये मलाविका मोहनन, अर्जुन दास, आंद्रिया जेरिमे आणि शांतानू भाग्यराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ५० कोटी रुपयांची कमाई आतापर्यंत मास्टरने केली आहे. हा सिनेमा हिंदीमध्ये पुन्हा तयार केला जाणार आहे.
हेही वाचा - ''हसतेस तेव्हा वाईट दिसतेस'', नेहा धुपियाला मिळाला होता सर्वात वाईट सल्ला