मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर 'अग्निहोत्र २' ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. 'अग्निहोत्र'च्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. 'अग्निहोत्र २' मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, कथेची गुंफण आणि दिग्दर्शन अशा गोष्टी जुळून आल्यामुळे 'अग्निहोत्र' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आता दुसऱ्या भागासाठीही जोरदार तयारी सुरु झाली आहे.
'अग्निहोत्र २' मध्ये कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेविषयी सांगताना 'स्टार प्रवाह'चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, '१० वर्षांचा काळ उलटला तरी आजही 'अग्निहोत्र'च्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवणं हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल'.
-
ज्या कथेने मराठी टेलिव्हिजनवर घडवला इतिहास..
— Star Pravah (@StarPravah) October 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
त्या अग्निहोत्रचा सुरु होणार नव्याने प्रवास...
अग्निहोत्र २.. लवकरच Star प्रवाह वर..#Agnihotra2 #StarPravah pic.twitter.com/26YlWck4WU
">ज्या कथेने मराठी टेलिव्हिजनवर घडवला इतिहास..
— Star Pravah (@StarPravah) October 15, 2019
त्या अग्निहोत्रचा सुरु होणार नव्याने प्रवास...
अग्निहोत्र २.. लवकरच Star प्रवाह वर..#Agnihotra2 #StarPravah pic.twitter.com/26YlWck4WUज्या कथेने मराठी टेलिव्हिजनवर घडवला इतिहास..
— Star Pravah (@StarPravah) October 15, 2019
त्या अग्निहोत्रचा सुरु होणार नव्याने प्रवास...
अग्निहोत्र २.. लवकरच Star प्रवाह वर..#Agnihotra2 #StarPravah pic.twitter.com/26YlWck4WU
हेही वाचा -एशिअन अॅकॅडमी क्रियेटिव्ह अवार्ड्स सोहळ्यात 'गली बॉय', 'दिल्ली क्राईम'ची बाजी
‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेविषयी सांगताना कथाकार श्रीरंग गोडबोले म्हणाले, ‘कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येतं आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. आजवर केलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र ही मालिका खूपच जवळची आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे.’
हेही वाचा -'फत्तेशिकस्त'मधील 'हेचि येळ देवा नका...' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला