ETV Bharat / sitara

‘मराठी पाऊल पडते पुढे‘ च्या सेटवर रंगला ‘मास्क-सॅनिटायझर’चा खेळ! - prakash baviskar latest news

आपल्या सेटवरचे शूटिंगदरम्यान थोडे तणावाचे झालेले वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत एक खेळ खेळायचा असे प्रकाश बाविस्कर यांनी ठरवले. लहानपणी जसे आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून "आरसा - टेलीफोन" हा रंजक खेळ खेळला जात होता. या खेळात जितक्या जलद समोरचा आदेश देईल तितक्याच चपळतेने त्याच्या आदेशाचा अभिनय करायचा असा नियम आहे. मात्र, अशाच पद्धतीचा "मास्क-सॅनिटायझर" खेळ सेटवर खेळण्यात यावा असे बाविस्करांनी सुचवले.

marathi paul padte pudhe unit play mask sanitiser game
‘मराठी पाऊल पडते पुढे‘ च्या सेटवर रंगला ‘मास्क-सॅनिटायझर’चा खेळ!
author img

By

Published : Jan 20, 2021, 5:42 PM IST

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टी प्रभावीपणे पुन्हा उभी राहावी म्हणून नवीन निर्मात्यांनी पुढाकार घ्यावा, असे वारंवार बोलले जाते. त्यामुळे उद्युक्त होऊन प्रकाश बाविस्कर यांनी शशाच पद्धतीचे कथानक निवडून निर्मितीक्षेत्रात प्रवेश केला आहे. मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी, ही त्यांच्या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. तसेच अकात डिस्ट्रिब्युशनचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

marathi paul padte pudhe unit play mask sanitiser game
‘मराठी पाऊल पडते पुढे‘ च्या सेटवर रंगला ‘मास्क-सॅनिटायझर’चा खेळ!

सध्या काही गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला "न्यू नॉर्मल"चे दृश्य दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीही हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठी चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" याचे चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी निर्माते आणि कलाकार अशा सर्वानी एक अनोखा खेळ खेळत या चित्रीकरणाची सांगता केली.

आपल्या सेटवरचे शूटिंगदरम्यान थोडे तणावाचे झालेले वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत एक खेळ खेळायचा असे प्रकाश बाविस्कर यांनी ठरवले. लहानपणी जसे आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून "आरसा - टेलीफोन" हा रंजक खेळ खेळला जात होता. या खेळात जितक्या जलद समोरचा आदेश देईल तितक्याच चपळतेने त्याच्या आदेशाचा अभिनय करायचा असा नियम आहे. मात्र, अशाच पद्धतीचा "मास्क-सॅनिटायझर" खेळ सेटवर खेळण्यात यावा असे बाविस्करांनी सुचवले. खेळात चित्रपटाचे निर्माते प्रकाश बाविस्कर हे सर्व कलाकारांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा अभिनय करायाला सांगत आहे आणि अभिनेता चिराग पाटील, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेते संजय कुलकर्णी आणि अभिनेते सतीश सलागरे हे त्यांच्या आदेशाचे पालन करत तो अभिनय करत आहेत. खेळीमेळीचे वातावरण राखत या कोरोनाकाळात आपण आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी, हे या खेळामागचे उद्देश आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव, अभिनेता चिराग पाटील "मराठी पाऊल पडते पुढे" या चित्रपटात मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे आपल्याला चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे या चित्रपटात खलभूमिका निभावत आहेत, अभिनेता संजय कुलकर्णी आणि अभिनेता सतीश सलागरे यांचीदेखील उल्लेखनीय भूमिका आहे. याचे चित्रीकरण सध्या संपले असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार ही माहिती अजून तरी गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा - "ग्रेट भारत'', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून अजिंक्यसेनेचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.