ETV Bharat / sitara

'येरे येरे पावसा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच

author img

By

Published : Oct 19, 2019, 9:46 AM IST

या चित्रपटातून पावसाची नेमकी कोणती बाजू पाहायला मिळणार, हे सध्या गुपित आहे. चित्रपटाचा कथाविषय मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

'येरे येरे पावसा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच

मुंबई - लहानग्यांच्या होड्यांना वाहून नेणारा खोडकर पाऊस. प्रियकर-प्रेयसीच्या आनंदात बरसणारा रिमझिम पाऊस. शेतकऱ्याला सुखावणारा समाधानकारक पाऊस.. तर, कधी गरजणारा घाबरवून सोडणारा बेताल पाऊस. अशी अनेकविध रूपांनी सजलेला हा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. आजही आबालवृद्धांच्या ओठी 'येरे येरे पावसा, तुला देतो पैसा' हे बालगीत रुळताना दिसलं की आपसूकच वातावरण एकदम रम्य होऊन जातं. पावसाच्या अनेकविध रूपांपैकी अशाच एका रूपावर 'येरे येरे पावसा' हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

Marathi film yereyere pawasa first poster launch

या चित्रपटातून पावसाची नेमकी कोणती बाजू पाहायला मिळणार, हे सध्या गुपित आहे. चित्रपटाचा कथाविषय मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांमध्ये उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर साऱ्यांच्याच पसंतीस पडले आहे.

हेही वाचा -'बॉईज'ना टक्कर द्यायला सिल्व्हर स्क्रीनवर 'गर्ल्स'ची एन्ट्री, टीझर प्रदर्शित

'येरे येरे पावसा' चित्रपटाचे संवाद अभिषेक संतोष जया करगुटकर यांचे आहेत. तर, ही कथा भूषण दळवी आणि शफाक खान यांनी लिहिली आहे. 'मिशन मंगल' फेम चंदन अरोरा हे हिंदीतील अनुभवी संकलक या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी आणि सहनिर्मिती बटरफ्लाय फिल्म्स यांची आहे. तर, दिग्दर्शन शफाक खान यांनी केलं आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'अग्निहोत्र'च्या मालिकेत कोणतं रहस्य असणार? दुसरा भाग पुन्हा 'स्टार प्रवाह'वर

Intro:लहानग्यांच्या होड्यांना वाहून नेणारा खोडकर पाऊस.. प्रियकर-प्रेयसीच्या आनंदात बरसणारा रिमझिम पाऊस.. शेतकऱ्याला सुखावणारा समाधानकारक पाऊस... तर कधी गरजणारा घाबरवून सोडणारा बेताल पाऊस... अनेकविध रूपांनी सजलेला हा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. आजही आबालवृद्धांच्या ओठी 'येरे येरे पावसा, तुला देतो पैसा' हे बालगीत रुळताना दिसलं की आपसूकच वातावरण एकदम रम्य होऊन जातं. पावसाच्या अनेकविध रूपांपैकी अशाच एका रूपावर 'येरे येरे पावसा' हा आगामी मराठी चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी निर्मित बटरफ्लाय फिल्म्स (चायना) सहनिर्मित आणि शफक खान' दिग्दर्शित 'येरे येरे पावसा' ह्या चित्रपटाद्वारे पावसाची कुठली बाजू आपल्याला पाहायला मिळणार हे सध्या गुपित आहे. चित्रपटाचा कथाविषय मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांमध्ये उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर साऱ्यांच्याच पसंतीस पडले आहे. 'येरे येरे पावसा' चित्रपटाचे संवाद अभिषेक संतोष जया करगुटकर यांचे आहेत तर ही कथा लिहिली आहे भूषण दळवी आणि शफाक खान यांनी. सुशांत एन.किशोर पवार यांच्या सुमधुर संगीताची साथ या 'येरे येरे पावसा'ला लाभणार आहे तर मिशन मंगल फेम चंदन अरोरा हे हिंदीतील अनुभवी संकलक या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत काम करत आहेत. शिवाय छायांकन योगेश कोळी, कला दिग्दर्शक योगेश एम.इंगळे ही इतर श्रेयनामावली आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.