मुंबई - मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच छोट्या पडद्यावरील मराठी कलाकारांच्या जोड्याही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मराठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. अशाच काही जोड्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
१. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर
महाराष्ट्रातील तमाम वहिनींचे लाडके आदेश भावोजी म्हणजे आदेश बांदेकर यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. 'होम मिनिस्टर' या मालिकेतून घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
२. निलेश साबळे आणि गौरी साबळे
'चला हवा येऊ द्या' मालिकेतून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे डॉ. निलेश साबळे हे देखील लोकप्रिय कलाकार आहेत. आपल्या विनोदशैलीने त्यांनी आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. निलेश साबळे २०१३ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. गौरीसुद्धा एक डॉक्टर आहे.
३. भाऊ कदम आणि ममता कदम
'चला हवा येऊ द्या' मालिकेतीलच लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम यांचीही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता पाहायला मिळते. त्यांच्या पत्नीचं नाव ममता कदम असे आहे.
४. पुष्कर श्रोत्री आणि प्रांजल श्रोत्री
मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडणारा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्करच्या पत्नीचं नाव प्रांजल श्रोत्री आहे. त्याने अलिकडेच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते.
५. श्रेया बुगडे आणि निखिल शेठ
'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे हिनेदेखील तिच्या विनोदशैलीने आजवर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. तिने २०१४ साली निखिल शेठ याच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. श्रेयाचं सासर आणि माहेर दोन्ही पुणे शहर आहे.