पुणे - कोरोनाच्या या महासंकटात पोलीस दल रस्त्यावर उतरून कोरोनाला हरविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्ये बजावत आहे. त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरले. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाच्या इथं मराठी कलाकारांनी एकत्र येत पुणे पोलिसांना गुलाबपुष्प आणि सुरक्षा किट देत त्यांचं कौतुक केलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही फलकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती देखील केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राने पोलिसांचा सन्मान करत त्यांना सहकार्य करा अशी हात जोडून विनवणी देखील कलाकारांनी केलीय.
आमच्या पिढीने बघटिलेल सर्वात मोठं संकट
आज देशावर कोरोना रुपी जे संकट आले आहे हे खूप भयावह आहे.आज पर्यंत आपण अनेक संकटांना तोंड दिल आहे. आमच्या पिडीने बघितलेलं हा सर्वात मोठं संकट आहे.आणि या संकटात महाराष्ट्र पोलीस ज्या हिरिरीने लढत आहे.ते खूप महत्त्वाचं आहे.आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक न एक जण बाधित आहे.अशी परिस्थिती असताना स्वतःचे दुःख विसरून आपल्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर पोलीस बांधव लढत आहे. अशा या बांधवाना फक्त आम्ही धन्यवाद देण्यासाठी इथं एकत्र आलो आहे,अशी माहिती यावेळी अभिनेता अमेय वाघ याने यावेळी दिली.
नागरिकांनी स्वतः च स्वतःहा थांबवलं पाहिजे
जो पर्यंत नागरिक स्वतः च स्वतःहा थांबवत नाही.तो पर्यंत पोलीस किती करणार.आज रस्त्यावर येऊन कोरोना योद्धा आपल्यासाठी काम करत आहे.पोलिसांशी रस्त्यावर नीट बोलणं हे आपलं कर्तव्य आहे.पोलीस बांधव हे आपल्यासाठी रस्त्यावर आले आहे.म्हणून अश्या या कोरोना योध्यांना मान सन्मान मिळालंच पाहिजे.अस मत यावेळी अभिनेत्री अक्षदा देवधर हिने व्यक्त केलं.
यावेळी राहुल सोलापूरकर, मिलिंद इंगळे, अक्षदा देवधर, मृण्मयी देशपांडे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, स्वप्निल वाघ यांसह विविध कलाकार उपस्थित होते.
हेही वाचा - 'मिशन मजनू'नंतर 'बीग बी'सोबत काम करणाऱ्या रश्मिकाने साईन केला आणखी एक बॉलिवूड चित्रपट