ETV Bharat / sitara

Madhavi gogate passed away : ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन

‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या अनेक लोकप्रिय नाटक मालिकेत भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन रविवारी झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Madhavi gogate
Madhavi gogate
author img

By

Published : Nov 21, 2021, 10:41 PM IST

मुंबई - ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ५८ वर्षाच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.

गेला माधव कुणीकडे यामुळे लोकप्रियता

गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या नाटकांसोबतच 'अंदाज आपला आपला' अशा मराठी नाटकात त्या झळकल्या. तर ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. “तुझं माझं जमतंय” या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

हेही वाचा - IFFI 2021 : 52 व्या ईफ्फी महोत्सवाचे शानदार उद्घाटन, हेमा मालिनींचा गौरव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.