मुंबई - माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ती 'पृथ्वीराज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. तसेच, या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. मानुषीने एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.
चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे दिग्दर्शन असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यशराज बॅनरच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. मानुषी छिल्लर या चित्रपटात राणी संयोगिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
![Manushi Chillar Shoots Prithviraj film song](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/manushi-chillar-shoots-for-prithviraj-song-2_3101newsroom_1580439726_1051.jpg)
मानुषीने आपल्या मेकअप आर्टिस्टसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 'माझ्या प्रत्येक स्टेपपाठी ते उभे असतात', असे कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे.
'पृथ्वीराज' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.