मुंबई - इंटरनेट सेंसेशन बनलेल्या रानू मंडल या त्यांच्या एका फोटोमुळे बऱ्याच चर्चेत आल्या. सोशल मीडियावर त्यांचा हेवी मेकअप लूक असलेला फोटो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. मात्र, हा फोटो खोटा असल्याचं आता समोर आलं आहे. त्यांचा मेकओव्हर करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट संध्या यांनीच या फोटोबद्दल एक खुलासा केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -शाहिद कपूरने शेयर केला 'जर्सी'च्या तयारीचा व्हिडिओ
'सर्व ट्रोल आणि विनोद हे चांगले आहेत. आम्ही त्यावर हसलो देखील. मात्र, कधीकधी हे ट्रोलिंग जास्त झाल्यावर भावना दुखावल्या जातात. रानू यांची खिल्ली उडवण्यासाठी कोणीतरी मुद्दामहून त्यांचा खोटा फोटो व्हायरल केला', असं त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
हेही वाचा -पाहा, समीर विद्वन्सच्या मल्टी स्टारर राजकीय नाट्याचा 'धुरळा'