ETV Bharat / sitara

'बिग बॉस'च्या घरात 'धकधक गर्ल'ची एन्ट्री, सलमान खानने असं केलं स्वागत - salman khan news

'बिग बॉस' या कार्यक्रमाबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळेच या कार्यक्रमाचे मेकर्स हा कार्यक्रम अधिकाधिक मनोरंजक बनवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. बिग बॉसचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये माधुरीची खास झलक पाहायला मिळते.

'बिग बॉस'च्या घरात 'धकधक गर्ल'ची एन्ट्री, सलमान खानने असं केलं स्वागत
author img

By

Published : Sep 28, 2019, 1:02 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि धकधक गर्ल माधुरी यांची केमेस्ट्री आजही प्रेक्षकांना आवडते. 'हम आपके है कौन', 'साजन' यांसारख्या चित्रपटातून या जोडीने चाहत्यांची मने जिंकली होती. लवकरच सलमान खान 'बिग बॉस १३' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी या घरात पाहुणी म्हणून भेट देणार आहे. तत्पूर्वी चित्रिकरणावेळी बिग बॉस च्या घरात तिची एन्ट्री झाल्यानंतर सलमानने तिचे खास अंदाजात स्वागत केले.

'बिग बॉस' या कार्यक्रमाबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळेच या कार्यक्रमाचे मेकर्स हा कार्यक्रम अधिकाधिक मनोरंजक बनवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. बिग बॉसचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये माधुरीची खास झलक पाहायला मिळते.

हेही वाचा -चाहतीनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर कार्तिकनं केलं असं काही, पाहा व्हिडिओ

सलमान खान माधुरीला संपूर्ण घर दाखवून वर्ल्ड टूर घडवतो. सुरुवातीला तो तिला किचन दाखवतो. किचनमध्ये गेल्यावर त्यांच्या 'हम आपके है कौन'मधील 'पेहला पेहला प्यार है' या गाण्याचं संगीत सुरू होतं. येथे दोघांची धमाल दाखवण्यात आली आहे. त्यानंतर दोघेही 'हम आपके है कौन' चित्रपटातीलच काही संवादाना उजाळा देतात.

हेही वाचा -स्पोर्ट्स ड्रामामध्ये कोचच्या भूमिकेत झळकणार तमन्ना भाटिया

'बिग बॉस सीझन १३' हा कार्यक्रम २९ सप्टेंबर पासून रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. सोमवार ते शुक्रवार हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.