मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षीत 'लव्ह आज कल' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. शिवाय सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात दिसणार असल्यामुळेही या चित्रपटाची आतुरता पाहायला मिळत होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एकंदर प्रतिक्रिया पाहता, हा ट्रेलर संभ्रमात पाडणारा असा आहे.
'लव्ह आज कल' हा चित्रपट सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचाच सिक्वेल आहे. सैफ अली खानची मुलगी असलेल्या सारा अली खानला या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. साराने यापूर्वी 'केदारनाथ' आणि 'सिंबा' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार चुणूक दाखवली होती. मात्र, 'लव्ह आज कल'च्या ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयाबाबत प्रेक्षक निराश झालेले दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -''मलाला बायोपिक बनवणे सोपे नव्हते, अजूनही येतात जीवे मारण्याच्या धमक्या''
या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यनच्या दुहेरी भूमिकेची झलक पाहायला मिळते. आजच्या पीढीच्या नातेसंबधांवर हा चित्रपट भाष्य करत असल्याचा अंदाज या ट्रेलरमधून येतो. दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर साराच्या एका सीनची बरीच चर्चा प्रतिक्रियांमध्ये पाहायला मिळते.
३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आपल्या करिअरविषयी सजग असलेली मुलगी आणि तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर यांची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच एका मध्यमवर्गीय मुलीचीही यामध्ये कथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाप्रमाणेच असणार का? हे मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.
१४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'मन फकीरा' १४ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला