ETV Bharat / sitara

'लक्ष्मी बॉम्ब'च्या दिग्दर्शकाचे पुनरागमन, अक्षयचे मानले आभार - kanchana

'लक्ष्मी बॉम्ब'च्या पोस्टर रिलीजदरम्यान राघव यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. त्यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट करत चित्रपटातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली होती.

'लक्ष्मी बॉम्ब'च्या दिग्दर्शकाचे पुनरागमन, अक्षयचे मानले आभार
author img

By

Published : Jun 2, 2019, 8:09 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टरमधून अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही पाहायला मिळाला. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी मधेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून माघार घेत, चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.

'लक्ष्मी बॉम्ब'च्या पोस्टर रिलीजदरम्यान राघव यांना काहीही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे ते दुखावले गेले होते. त्यांनी याबाबत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट करत चित्रपटातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून ते पुन्हा या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी परतले असल्याचे सांगितले आहे.

Laxmmi Bomb Directer Raghava Lawrence back on directorial board
'लक्ष्मी बॉम्ब'च्या दिग्दर्शकाचे पुनरागमन, अक्षयचे मानले आभार

अक्षय कुमारने पुढाकार घेऊन दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये संवाद घडवून आणला. त्याच्यामुळे आणि चाहत्यांच्या आग्रहाखातर मी पुन्हा या चित्रपटाचा भाग होण्यासाठी परतलो आहे, असे ट्विट राघव यांनी केले आहे. अक्षय कुमार यांनी माझ्या भावना समजुन घेतल्या. जे गैरसमज निर्माण झाले होते ते अक्षय कुमारमुळेच दुर झाले. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा भाग झाल्याने मी आनंदी आहे, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आता लक्ष्मी बॉम्बच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्युल चैन्नई येथे सुरू आहे. हा चित्रपट 'कंचना' चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार तृतीयपंथीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे.

Intro:Body:

ashvini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.