ETV Bharat / sitara

'कुछ कुछ होता है'चा येणार सिक्वेल, करण जोहरने दिले संकेत - जान्हवी कपूर

शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची केमेस्ट्री 'कुछ कुछ होता है' चित्रपटात पाहायला मिळाली. आता सिक्वेलमध्ये कोणते कलाकार झळकणार याबाबतही काही नावे समोर आली आहेत.

'कुछ कुछ होता है'चा येणार सिक्वेल, करण जोहरने दिले संकेत
author img

By

Published : Aug 18, 2019, 10:03 AM IST

मुंबई - करण जोहरच्या करिअरमधला सुपरहिट ठरलेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याचे संकेत खुद्द करण जोहरने दिले आहेत. तरुणाईमधील या चित्रपटाची क्रेझ पाहता, याचा सिक्वेल तयार झाला तर त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेत, असे करण जोहरने म्हटले आहे.

शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची केमेस्ट्री 'कुछ कुछ होता है' चित्रपटात पाहायला मिळाली. आता सिक्वेलमध्ये कोणते कलाकार झळकणार याबाबतही काही नावे समोर आली आहेत.

मेलबर्न येथे करण जोहरला याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. 'कुछ कुछ होता है'चा सिक्वेल बनवणे ही माझी इच्छा आहे. जर सिक्वेल तयार झालाच, तर यामध्ये रणवीर सिंग 'राहुल'च्या भूमिकेत असेल. तर, आलिया भट्ट 'अंजली' आणि जान्हवी कपूर 'टीना'च्या रूपात झळकेल, असेही करण जोहरने सांगितले. पुढे त्याने 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या काही मजेशीर आठवणी देखील सांगितल्या.

'जेव्हा मी शाहरुख आणि काजोलकडे या चित्रपटासाठी बोलायला गेलो होतो, तेव्हा त्यांना फक्त एकाच सिनची माहिती दिली होती. माझ्याकडे तेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण नव्हती. त्यामुळे मी त्यांना म्हणालो होतो, की जर तुम्हाला एक सिन आवडला तर, मी तुम्हाला पूर्ण चित्रपटाचं वर्णन करुन सांगेल. हे सर्व खोटं होतं. तरीही शाहरुख आणि काजोलने माझ्यावर विश्वास ठेवला', असेही तो म्हणाला.

या चित्रपटासाठी सुरुवातीला तब्बू, उर्मिला, ऐश्वर्या यांनाही विचारण्यात आले होते. यापैकी फक्त ऐश्वर्यांने त्याला फोन करुन नकार कळवला होता. पुढे आदित्य चोप्राने राणी मुखर्जीचे नाव सुचवल्याने राणीला चित्रपटात संधी मिळाली.

१९९८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील शाहरुख, काजोल आणि राणीची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात रुजलेली आहे. तर, सलमान खाननेही या चित्रपटात स्पेशल भूमिका साकारली होती. त्याला या चित्रपटासाठी पुरस्कारही मिळाला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.