ETV Bharat / sitara

'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात सलमानसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी

सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलची माहिती दिली होती.

author img

By

Published : Jan 12, 2020, 4:29 PM IST

'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात सलमानसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी
'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात सलमानसोबत 'या' अभिनेत्रीची वर्णी

मुंबई - अभिनेता सलमान खानने अलिकडेच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहाद समजी आणि साजीद नादियाडवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनची वर्णी लागली आहे.

सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दलची माहिती दिली होती. पुढच्या वर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल. वेळोवेळी या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर केले जातील, असे या चित्रपटाशी संबधीत सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा -अभिनेत्यानंतर खासदार बनलेला सनी देओल हरवला!, काय आहे प्रकरण?

अलिकडेच सलमान खान 'दबंग ३' चित्रपटात दिसला. या चित्रपटानंतर तो 'राधे' चित्रपटात झळकणार आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. तर, क्रिती सेनॉनने 'हाऊसफुल ४' चित्रपटात भूमिका साकारली होती. तसेच, 'पानिपत' चित्रपटातही तिची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाली.

आता 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि क्रिती सेनॉन यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -Exclusive Interview: सनी सिंग आणि सोनाली सेहगलने उलगडला 'जय मम्मी दी' चित्रपटाचा प्रवास

Intro:Body:

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.