ETV Bharat / sitara

क्रिती सॅनॉनची चित्रपटसृष्टीत ७ वर्षे पूर्ण, खिशात आहेत नवेकोरे ७ चित्रपट

क्रिती सॅनॉन तिच्या बॉलिवूडमधील ७व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने म्हणाली की, ‘हा आतापर्यंतचा एक सुंदर प्रवास आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला टप्पा आहे’. या निमित्ताने कृती सॅनॉनने आपला पहिला चित्रपट ‘हिरोपंती’ च्या सेटवरील जुनी छायाचित्रे शेअर करीत आठवणी ताज्या केल्या आणि बॉलिवूडमध्ये जम बसण्याबद्दल प्रेक्षकांचे आणि फॅन्सचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

kriti sanon completes seven years in bollywood

author img

By

Published : May 23, 2021, 8:22 PM IST

मुंबई - क्रिती सॅनॉन तिच्या बॉलिवूडमधील ७व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने म्हणाली की, ‘हा आतापर्यंतचा एक सुंदर प्रवास आहे, माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला टप्पा आहे’. या निमित्ताने कृती सॅनॉनने आपला पहिला चित्रपट ‘हिरोपंती’ च्या सेटवरील जुनी छायाचित्रे शेअर करीत आठवणी ताज्या केल्या आणि बॉलिवूडमध्ये जम बसण्याबद्दल प्रेक्षकांचे आणि फॅन्सचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. सात वर्षांपूर्वी याच तारखेला क्रिती सॅनॉन चा पदार्पणीय चित्रपट ‘हिरोपंती’ प्रदर्शित झाला होता. सध्या ती एक आघाडीची अभिनेत्री असून तिने इतक्या कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये खूप लांबचा पल्ला गाठला आहे.

क्रिती सॅनॉनची चित्रपटसृष्टीत ७ वर्षे पूर्ण
क्रिती सॅनॉन ने तिच्या सोशल मीडियावर तिचा ‘हिरोपंती’ मधील हिरो-सहकलाकार टायगर श्रॉफ, दिग्दर्शक शब्बीर खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्याबरोबरच्या आठवणी जागवत, फोटो शेयर केले आणि त्यांचेही धन्यवाद मानले. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "हिरोपंती ला झाली ७ वर्षे, चित्रपट उद्योगातही माझी ७ वर्षे, मी जे काही करतेय त्याबाबत आनंदी आहे. .. हा आतापर्यंतचा एक सुंदर प्रवास, माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला टप्पा आहे ..या छायाचित्रांमुळे बर्‍याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत .. आज तुम्हा सर्वांना मी ‘मिस’ करतेय... @tigerjackieshroff #SajidSir @sabbir24x7 @wardakhannadiadwala @nadiadwalagrandson 💖💖"ही छायाचित्रे सामायिक करून तिने साजिद नाडियाडवाला यांनी तिला सिनेमाच्या जादुई जगात आणल्याबद्दल त्यांचे आभार मानले कारण ‘हिरोपंती’ पासून ते आगामी चित्रपट बच्चन पांडेपर्यंतचा प्रवास तिच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट टप्पा कसा आहे असे ती मानतेय. टायगर श्रॉफबरोबर ती आगामी गणपत या चित्रपटासाठी जो ऍक्शनने भरलेला आहे पुन्हा एकत्र येणार आहे. क्रिती सॅनॉन ने तिच्या ऑडिशनच्या दिवशीच तिची निवड कशी केली गेली याचा उल्लेखही केला आहे.
kriti sanon completes seven years in bollywood
क्रिती सॅनॉनची चित्रपटसृष्टीत ७ वर्षे पूर्ण
ही गुणी अभिनेत्री, जी ‘आउटसायडर’ म्हणून फिल्म इंडस्ट्रीत दाखल झाली, ती आता बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिच्या खिशात सध्या ७ बिग बजेट चित्रपट असून ७ वर्षांच्या इतक्या कमी काळात इतके भरगच्च काम करणारी ती एकमेव अभिनेत्री असावी. क्रिती ‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभास सोबत ‘आदिपुरुष’ मध्ये काम करीत असून तिचा अक्षय कुमारबरोबरच ‘बच्चन पांडे’ जवळपास तयार आहे. ती वरुण धवनसोबत ‘भेडिया’ करतेय आणि टायगर श्रॉफ सोबत ‘गणपत’.

त्याचबरोबर क्रिती सॅनॉन ने एक नवीन चित्रपट साईन केलाय ज्याचे अजून नाव ठरलेले नाहीये आणि तिची प्रमुख भूमिका असणारे ‘हम दो हमारा दो’ आणि ‘मिमी’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.