ETV Bharat / sitara

'आदिपुरुष'मध्ये सीतेच्या भूमिकेत झळकणार कृती सेनॉन - रावणाची भूमिका सैफ अली खान

अभिनेता प्रभास आदिपुरुष या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार असून यात कृती सेनॉनची निवड सीतेच्या भूमिकेसाठी झाली आहे. कृतीने एक फोटो पोस्ट करीत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

Adipurush
आदिपुरुष
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:40 PM IST

हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन आगामी पौराणिक चित्रपटाच्या भव्य स्टार कास्टमध्ये सामील झाली आहे. या चित्रपटात सैफ अली खान, प्रभास आणि सनी सिंग या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

शुक्रवारी कृतीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या कलाकार व दिग्दर्शकासोबतचा फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली आहे. कृतीने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "एक नवीन प्रवास सुरु होत आहे. आदिपुरुष खास आहे. या जादुई दुनियेचा भाग बनल्याचा अभिमान वाटतो.''

या चित्रपटात अभिनेता प्रभास राम ही व्यक्तीरेखा साकारणार असून लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, प्रभास आणि सनी सिंगसोबतचा फोटो कृतीने पोस्ट केला आहे.

आदिपुरुष या चित्रपटात कृती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे.

११ ऑगस्ट २०२२ रोजी सध्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची फेब्रुवारी महिन्यात निर्मिती सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या ब्लॉकबस्टर तन्हाजी: द अनसंग वॉरियर नंतर ओम राऊत यांचा आदिपुरुष हा नवीन दिग्दर्शकीय उपक्रम आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - ‘माझ्यासाठी भारतीय राष्ट्रगीत सर्वात बेस्ट कंपोझिशन आहे’, परिणीती चोप्रा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.