मुंबई - 'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा एकदा एका जुन्या पात्राची एन्ट्री झाली आहे. सोनी टीव्हीच्या ट्विटरवरुन याची माहिती देण्यात आलीय. यापूर्वी 'द कपिल शर्मा शो' शोमध्ये किकू शारदा या अभिनेत्याने 'बंपर' या नर्सची भूमिका साकारली होती. मात्र अलीकडे या पात्राला शोमध्ये स्थान नव्हते. तो बच्चा यादवची व्यक्तीरेखा साकारायचा. परंतु बंपरची पुन्हा एन्ट्री झाल्याने कॉमेडीला नवा तडका मिळणार आहे.
'दि स्काय इज पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री प्रियंका चोप्रा शोमध्ये आली होती. याच्या प्रमोशन व्हिडिओमध्ये किकू शारदा बंपरच्या वेशभूषेत धमाल करताना दिसतो. शोमध्ये परतताच या बंपरने कपिल शर्माची अशी काही फिरकी घेतली की हास्याचे फवारे उमटले.
-
Miliye sabki favorite Bumper se aur jaaniye kya hai unke roop ke badlaav ka raaz? Dekhiye #TheKapilSharmaShow iss Sat raat 9:30 baje @kapilsharma @kikusharda @chandanprabhakar @krushna30 @bharti.laughterqueen @banijayasia @archanapuransingh @priyankachopra @FarOutAkhtar pic.twitter.com/nC9JBZY5m4
— Sony TV (@SonyTV) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Miliye sabki favorite Bumper se aur jaaniye kya hai unke roop ke badlaav ka raaz? Dekhiye #TheKapilSharmaShow iss Sat raat 9:30 baje @kapilsharma @kikusharda @chandanprabhakar @krushna30 @bharti.laughterqueen @banijayasia @archanapuransingh @priyankachopra @FarOutAkhtar pic.twitter.com/nC9JBZY5m4
— Sony TV (@SonyTV) October 2, 2019Miliye sabki favorite Bumper se aur jaaniye kya hai unke roop ke badlaav ka raaz? Dekhiye #TheKapilSharmaShow iss Sat raat 9:30 baje @kapilsharma @kikusharda @chandanprabhakar @krushna30 @bharti.laughterqueen @banijayasia @archanapuransingh @priyankachopra @FarOutAkhtar pic.twitter.com/nC9JBZY5m4
— Sony TV (@SonyTV) October 2, 2019
'दि स्काय इज पिंक' या चित्रपटात फरहान आणि प्रियांका चोप्रा दोघेही सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका मुंबईला परतली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे. प्रेरणादायी वक्ता असलेल्या आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अभिनेत्री झायरा वसिम यामध्ये आयशाची भूमिका साकारणार आहे. तर, प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर दोघे तिच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'टोरान्टो फिल्म फेस्टिव्हल'मध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.