ETV Bharat / sitara

खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार डिसेंबरमध्ये - organizer of the festival is Raja Bundela

सहावा खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (केएफआयआय) १७ ते २३ डिसेंबर या काळात पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोनासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल.

Khajuraho International Film Festival
खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
author img

By

Published : Oct 7, 2020, 12:49 PM IST

छतरपूर (मध्य प्रदेश) - आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर खजुराहो येथे सहावा खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (केएफआयआय) डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोनासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल.

या चित्रपट महोत्सवाचे आयोजक अभिनेता राजा बुंदेला यांनी याबद्दल सांगितले की, यावेळचा फिल्मउत्सव १७ ते २३ डिसेंबर या काळात होईल.हा चित्रपट महोत्सव ऋषी कपूर, इरफन खान, सुशांतसिंह राजपूत, बासू चटर्जी यासारख्या कलाकारांना समर्पित केला जाणार आहे. त्यांच्या आठवणी जागवल्या जाणार आहेत.

त्यांनी सांगितले की, कोरोना साथीमुळे सरकारने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील, परदेशी पाहुणे येणार नाहीत, सामाजिक अंतर पाळले जाईल. यावेळी प्रेक्षक आभासी मार्गाने महोत्सवाशी जोडले जातील. यावेळी शबाना आझमीसुद्धा या कार्यक्रमात भाग घेतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.