मुंबई - करिना कपूरचा बॉलिवूड प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. गेली २ दशके ती विविध सिनेमातून भूमिका साकारत आहे. तणावात काम न करता आपल्या अटींवर काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. ती 'हिंदी मीडियम २' या आगामी चित्रपटात इरफान खानसोबत झळकणार आहे. आजपर्यंत न साकारलेली व्यक्तीरेखा ती यात साकारणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार करिना कपूर यात पोलिसाची भूमिका करीत आहे. हा चित्रपट साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. काही वर्षांपासून ती आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रयोग करीत आहे. २०१८ मध्ये तिने वीरे दी वेडिंगमध्ये फेमिनिस्टच्या भूमिकेत दिसली होती.
हिंदी मीडियम २ हा चित्रपट आणखी एका गोष्टीसाठी विशेष आहे ते म्हणजे इरफान खान दीर्घ आजारानंतर यात काम करतोय. चित्रपटाची कथा इरफान खानच्या मुलीभोवती गुंफलेली आहे.चित्रपटाचे शूटींग एप्रिलमध्ये सुरु होईल. परंतु करिना यासाठी मे अखेरीस लंडनमध्ये शूटींग करेल.
हिंदी मीडियमचा सीक्वल असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करीत असून याचे दिग्दर्शन होमी अदाजानिया करतील.