मुंबई - लॉकडाऊननंतर पुन्हा पूर्ववत गोष्टी सुरळीत होत आहेत. अभिनेत्री करिना कपूर-खानने मंगळवारी आपल्या टीमसोबतचा एक फोटो पोस्ट करुन न्यू नॉर्मलसाठी सज्ज होत असल्याची झलक दाखवली आहे.
तिच्या योद्धाच्या मदतीने शूटसाठी तयार झाल्याचा एक ग्लॅमरस फोटो करिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोत करिना टिमसोबत आरशात पाहताना दिसत आहे.
- View this post on Instagram
Another day, another shoot... my warriors ❤️❤️ Missing you Poonie #TheNewNormal
">
फोटोमधील सर्वांनी मास्क परिधान केला असून करिनासाठी ते पुन्हा पूर्ववत कामासाठी सज्ज झालेले दिसत आहेत.
हेही वाचा - एस एस राजामौलीच्या चित्रपटातून आलिया भट्टला वगळले, जागा घेणार प्रियंका चोप्रा?
या पोस्टला केवळ १८ मिनिटातच ७६ हजार लोकांनी लाईक केले आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटीजनाही हा फोटो आवडला आहे. यामध्ये अनन्या पांडे आणि इतरांचा समावेश आहे. यापूर्वी गणेश चतुर्थी रोजी करिनाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला तैमुरचा फोटो चाहत्यांना आवडला होता.