मुंबई - ‘बिग ब्रदर’ या कार्यक्रमाचा अवतार ‘बिग बॉस’ भारतातील सर्वात मोठा रियालिटी शो बनला आहे. यावर्षी त्यात थोडा बदल होणार आहे जेणेकरून प्रेक्षकांचा मनोरंजन फॅक्टर डबल होईल. हा कार्यक्रम तीन महिने ओटीटी वर आणि नंतर टेलिव्हिजन वर प्रदर्शित होणार आहे. कलर्स वाहिनीचा ओटीटी प्लॅटफॉर्म वूटने नुकतेच 'बिग बॉस ओटीटी'च्या प्रीमिअरची घोषणा केली. या बहुप्रतिक्षित शोचे पहिले आठवडे चाहत्यांना त्यांच्या मोबाइलमध्ये २४ तास पाहता येणार आहेत.
हा शो पहिल्यांदाच फक्त वूटवर दाखवण्यात येणार आहे आणि तो नाट्य, मनोरंजन व भावनांसह प्रेक्षकांना अद्वितीय अनुभव देण्याचे वचनसुद्धा देतोय. या शोची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली होती की याचे सूत्रसंचालन कोण करणार. आता करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’ चे सूत्रसंचालन करणार आहे हे जाहीर झालंय आणि तो स्वतः या शोचा खूप मोठा फॅन असल्यामुळे 'बिग बॉस ओटीटी'चा होस्ट बनणे हे या दिग्गज चित्रपटनिर्मात्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. यावेळी 'जनता' फॅक्टर अव्वल दर्जाचा असणार आहे, जेथे सामान्य व्यक्तीला असामान्य शक्ती मिळणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना थेट व सखोल सहभाग, कनेक्शनचा आनंद घेण्यासोबत घरामध्ये येणा-या व जाणा-या स्पर्धकांशी संलग्न होण्याची संधी मिळणार आहे. या रियालिटी शोच्या सेलिब्रिटी निवासींमध्ये सामावून जाण्यास, त्यांना मार्गदर्शन करण्यास किंवा त्यांच्यासोबत बॉसप्रमाणे वागण्यास करण उत्सुक असला तरी तो स्वत: ‘बिग बॉस’ च्या घरात कधीच राहू शकणार नाही असे तो सांगतो. ‘बिग बॉस’ च्या नियमांनुसार त्यातील स्पर्धक घरामध्ये त्यांच्यासोबत कोणतेही ‘गॅजेट’ घेऊन जाऊ शकत नाही. या घरात स्पर्धक मोबाईल, घड्याळ, लॅपटॉप अथवा कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ शकत नाहीत. बिग बॉस ओटीटी हाऊसमध्ये स्पर्धक म्हणून सहा आठवडे व्यतित करण्याबाबत विचारले असताना करण म्हणाला, ‘सहा आठवडे घरामध्ये बंदिस्त? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही. विचार करा, मी एका तासामध्ये किती गोष्टी चुकवेन. अरे बापरे, माझी असे होण्याची जरादेखील इच्छा नाही.'' 'बिग बॉस ओटीटी' हा शो टेलिव्हिजनवर प्रिमिअर होण्यापूर्वी ८ ऑगस्ट २०२१ पासून सहा आठवडे फक्त वूटवर पाहता येणार आहे.
हेही वाचा - चितेवर पोहोचलेल्या आजी झाल्या जिवंत; कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील प्रकार