ETV Bharat / sitara

'मी मुर्ख आहे का?' ड्रग पार्टीच्या व्हिडिओवर करण जोहरने सोडले मौन

करण जोहरच्या घरी ड्रग पार्टी झाल्याचा आरोप दिल्लीच्या आमदाराने केला होता, असा व्हिडिओ पोस्ट करायला मी मुर्ख आहे का? असा सवाल करीत हे आरोप फेटाळून लावले.

करण जोहर
author img

By

Published : Aug 19, 2019, 5:20 PM IST

मुंबई - काही आठवड्यापूर्वी दिल्लीचे आमदार मजिंदर सिरसा यांनी करण जोहरच्या घरी ड्रग पार्टी झाल्याचा आरोप केला होता. या पार्टीत बॉलिवूडचे मोठे कलाकार उपस्थित होते. यात दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जुन कपूरसह अनेकजण हजर होते. बऱ्याच काळानंतर या प्रकरणी करण जोहरने आपले मौन सोडले आहे.

मजिंदर सिरसा यांनी करणच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ शेअर केला होता. या पार्टीत लोक ड्रग सेवन करीत असल्याचा आरोप झाल्यामुळे बॉलिवूड कलाकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

करण जोहरने अलिकडे राजीव मसंद यांना एक मुलाखत दिली, यात त्याने या विषयावर भाष्य केलंय. आठवडाभराच्या कष्टानंतर एका संध्याकाळी इंडस्ट्रीतील लोक जमले होते. मी त्यांचा व्हिडिओ केला. तिथं जर असे काही घडत असते तर तो व्हिडिओ पोस्ट करायला मी मुर्ख आहे का ? असा सवाल त्याने केला.

विकी कौशल डेंग्यूने आजारी होता. तो गरम पाणी पीत होता, असेही करणने सांगितले. हा व्हिडिओ शूट करण्याआधी पाच मिनिटापूर्वी माझी आई तिथे बसली होती, असेही तो म्हणाला. एकत्र बसून संगीत ऐकत खाद्य पदार्थांचा आनंद सर्वजण घेत होते हे सांगायलाही करण विसरला नाही. अशा तथ्यहिन गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले असल्याचेही करणने सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.